इतर

Tomato Rate | टोमॅटोचे दरवाढ होण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या एका क्लिकवर…

What is the real reason for the increase in the price of tomatoes? Know in one click…

Tomato Rate | मागील काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव इतके घसरले होते की, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना खर्चही वसूल करता आला नाही. टोमॅटो खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून तीन ते पाच रुपये किलोने टोमॅटो (Tomato Rate) खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना अनेक क्विंटल टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून द्यावे लागले. मात्र, सध्या कवडीमोल भावाने विकला जाणारा टोमॅटो आता इतका महाग झाला आहे की, सर्वसामान्यांना तो परवडणार देखील नाही. बाजारात 10 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो सध्या 100 ते 150 रुपये किलोने विकला जात आहे. मात्र, टोमॅटोचे दर एवढे वाढल्याचे कारण तुम्हाला माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

दरवाढ होण्याचे कारण काय?

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पावसाने देशात उशिरा हजेरी लावली. तसेच, वातावरणातील उच्च तापमानामुळे टोमॅटोचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. टोमॅटोची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे दरवाढ झाली आहे. मे आणि जून महिन्यामध्ये टोमॅटोचे दर वाढत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली.

मात्र, पुरवठा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना तीन ते पाच रुपये किलो दराने टोमॅटो विक्री करावा लागला. हवा तसा भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. टोमॅटोचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन केले नाही. याचा परिणाम जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यामध्ये टोमॅटोला मागणी आली मात्र त्यावेळी उत्पादन घटले होते. त्यामुळे टोमॅटोचे दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कधी होणार टोमॅटोचे दर कमी?

दरम्यान, टोमॅटोची झालेले मोठ्या प्रमाणातील दरवाढ ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आवाक्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. टोमॅटोचे भाव वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा टोमॅटोची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. हा टोमॅटोचे उत्पादन बाजारात येण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता टोमॅटोचे दर आटोक्यात येण्यासाठी सर्वसामान्य जनतेला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: What is the real reason for the increase in the price of tomatoes? Know in one click…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button