इतर
GK Questions | तुम्हाला माहित आहे का? टायरवर लिहिलेल्या अक्षरांचा अर्थ? जाणून घ्या सविस्तर
GK Questions | टायरवर अनेकदा आपण अक्षरे लिहिलेली पाहतो. काही वेळा कंपनीचं नाव, तर काही वेळा अंक आणि इंग्रजीतील अक्षरे असतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या गाडीसाठी टायर (GK Questions) घेतो. पण तुम्हाला माहित आहे का, टायरवर लिहिलेली अक्षरे आपल्या कामाची आहेत?
कारचे मालक टायरबद्दल सामान्य लोकांपेक्षा जास्त माहिती असतात. पण तरीही काही लोकांना याबद्दल फार कमी माहिती आहे.
टायर्सवर L ते Y अक्षरे लिहिलेली असतात. या अक्षरांचा अर्थ टायरची कमाल वेग मर्यादा दर्शवतो. म्हणजे कोणता टायर कोणत्या वेगाने चालवता येईल.
- L = 120 किमी/तास
- M = 130 किमी/तास
- N = 140 किमी/तास
- P = 150 किमी/तास
- Q = 160 किमी/तास
- R = 170 किमी/तास
- H = 210 किमी/तास
- V = 240 किमी/तास
- Y = 300 किमी/तास
टायरवर लिहिलेल्या अक्षरांच्या वेग मर्यादेत वाहन चालवल्याने टायर फुटणार नाहीत. हे तुमच्या कारसाठी चांगले आहे.
टायर निवडताना या अक्षरांचा विचार करणे आवश्यक आहे. आपण नेहमी आपल्या गाडीच्या क्षमतेनुसार आणि आपण चालवण्याच्या वेगानुसार टायर निवडा.