इतर

Today’s Weather Update | अरे वाह! घाटमाथ्यावर पुन्हा वाढला पावसाचा जोर; जाणून घ्या आज कधी कुठे किती होणार पाऊस?

Today's Weather Update

Today’s Weather Update | देशात मान्सून ऋतू सुरू झाला असूनही राज्यात अजूनही पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या यंदा लांबणीवर गेल्या आहेत. सर्वत्र पाऊस नसला तरीही घाटमाथ्यावर पाऊस संत गतीने चालू होता. मात्र, काही दिवसांपासून घाटमाथ्यावरील पावसाचा (Today’s Weather Update) जोर बंद झाला होता. अशातच, आता पुन्हा एकदा घाटमाथ्यावर आणि राज्यातील इतर भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू

लोणावळा, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण आणि कुंडली इत्यादी घाटमाथ्यांवर काही दिवसांपासून कमी झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. तसेच, या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षण असणारे धबधबे वाहण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवार (ता. 7) लोणावळा घाटमाथ्यावर सकाळी 8 वाजेपर्यंत 63 मिलिमीटर एवढा सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

दरम्यान, राज्यात पावसाचा जोर हा कमी-जास्त होत असल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच, वातावरणातही गारवा पसरलेला आहे. बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड, आणि पुरंदर इत्यादी भागांमध्ये सातत्याने पावसाची रिमझीम सुरू आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणक्षेत्रामध्ये शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर, पवना आणि गुंजवणी धरणक्षेत्रामध्ये पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी बरसल्या आहेत. तसेच, शेतकऱ्यांना पेरणीसाठी जोरदार पाऊस पडण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.

Web Title: Oh wow! Heavy rain increased again on Ghat Matha; Know when and how much rain will happen today?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button