ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Advice | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यात 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता, जाणून घ्या पेरणीची योग्य वेळ आली का?

Agricultural Advice | प्रादेशिक हवामान अंदाजानुसार दिनांक 27-28 जुन दरम्यान सर्व ठिकाणी दिनांक 29 जुन रोजी बहुदा सर्वत्र आणि दिनांक 30 जून ते जुलै दरम्यान विरळ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अत्याधिक संभावना आहे. सतर्क इशारा दिनांक 24-25 जून दरम्यान एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 28 जून रोजी मुसळधार पाऊस हा अत्याधिक संभावना आहे. शेतकरी मित्रांनो जाणून हवामान आधारीत कृषी सल्ला (Agricultural Advice) काय आहे.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

उन्हाळी कामे कधी करावीत?


मौसमी पाऊसाची सुरुवात झाल्यावर सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला घाई करू नये. पिक नियोजनानुसार ती मशागत करून पेरणीसाठी तयार ठेवावे. तसेच पाणी जागेवरच मुरण्यासाठी शेती मशागत सपाट (कंटूर) रेषेला समांतर किंवा आडवी करावी.

सोयाबीन


मौसमी पावसाची सुरुवात झाल्यावर सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य 75 ते 100 मीमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. पुढील पिक नियोजनानुसार शिफारस केलेले बियाणे उपलब्ध करून ठेवावे, शक्य असल्यास स्वतः जवळचे घरचे चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच प्रमाणित नसलेल्या बियाण्याच्या बाबतीत, उगवण शक्ति अवश्य तपासून पाहावी आणि त्यानुसार प्रती हेक्टर बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी जैविक खते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम 21 ग्रॅम/किलो, पीएसबी 25 ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्म 4 ग्रॅम/ किलो, थायरम कॅर्बेन्डाझीम 2+1 ग्रॅम/किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

तूर


मौसमी पाऊसाची सुरुवात झाल्यावर सलग दोन ते तीन दिवसात पेरणी ला योग्य 75 ते 100 मी मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. तूर पेरणीसाठी कमी कालावधीसाठी मध्यम जमिनीसाठी मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनी करिता ( बीएसएमआर- 736, पीकेव्ही तारा, बीएसएमआर-853), तसेच अधिक कालावधीसाठी भारी जमिनी करिता (आयसीपीएल 87119 B.C (आशा) व पीडीकेव्ही आश्लेशा ) वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण 12 ते 15 किलो वापरावे.

Web Title: Important news for farmers! Chance of 2 days of heavy rain in the state, know whether it is the right time for sowing?

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button