ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Monsoon Update | भारतीय हवामान विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर ; राज्यात सरासरी ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता

Monsoon Update |देशातील शेतकरी मान्सूनकडे (Monsoon) डोळे लावून बसले आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने आज(ता.२६) मान्सून संदर्भात दुसरा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ९६ टक्के कोसळणार आहे. यामध्ये जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच देशात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

अल निओ साठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात

जूनमध्ये मराठवाडा, विदर्भ याठिकाणी कमी पाऊस पडेल व संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमान असेल. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. राज्यात अल निनोसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

तिसरा अंदाज जुलैमध्ये जाहीर होणार

देशात यंदा ९६ टक्के पाऊस कोसळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज चिंतेचा विषय आहे. हवामान विभागाचा मान्सूनचा तिसरा अंदाज जुलै मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

पाऊस मोजण्याच्या पाच श्रेण्या

भारतीय हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत.

१) ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस – अपुरा पाऊस
२) ९० ते ९५ टक्के पाऊस – सरासरीपेक्षा कमी पाऊस ३) ९६ ते १०४ टक्के पाऊस – सामान्य सरासरी पाऊस
४) १०५ ते ११० टक्के पाऊस – अधिक पाऊस
५) ११० टक्क्यांच्या पुढे – सर्वाधिक पाऊस

यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पाऊस पडू शकतो.

Indian Meteorological Department announced second monsoon Update

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button