ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Eknath Shinde | मुखमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना दिलासा ! म्हणाले, ” यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही…”

Eknath Shinde |राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खतांच्या किंमती, पीक कर्ज, नुकसान भरपाई या मुद्द्यांवर आजच्या खरीप हंगामपूर्व बैठकीत चर्चा झाली.

बँकांनी फिरवली शेतकऱ्यांकडे पाठ

मागील काही दिवसांपासून राज्यातील बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. ऐन सुगी तोंडावर आली असता शेतकऱ्यांना सुगीसाठी आर्थिक मदतीची गरज आहेत. अशातच बँकांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

देवेंद्र फडणवीस यांची आक्रमक भूमिका

शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीमध्ये दिले आहेत.

बँकांवर होणार थेट कारवाई

जर बँका राज्य सरकारची धोरणं ऐकत नसतील तर त्यांना फटका दिल्याशिवाय कळणार नाही. अशा बँकांवर एफआयआर दाखल करावा जेणेकरून बँकाना समज मिळेल असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान पीककर्ज नाकारत असणाऱ्या बँकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश देखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

बळीराजाचे सरकार

हे सरकार बळीराजाचे सरकार आहे. बळीराजाच्या जीवाशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही. हा खरीप हंगाम यशस्वीपणे जाण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल. या हंगामात खतांच्या किंमतीत वाढ होणार नाही. तसेच विमा कंपन्यांकडून कसल्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक केली जाणार नाही. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चालू वर्षीच्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, सुरेश खाडे, अतुल सावे, दीपक केसरकर
हे नेते उपस्थित होते.

farmers are not going to face any difficulty in upcoming kharif season

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button