ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Royal enfield | खुशखबर ! रॉयल एनफिल्डची ‘इलेक्ट्रिक बुलेट’ येणार रे sss ; जाणून घ्या बाईकच्या डिझाईन आणि इतर गोष्टींबद्दल

Royal enfield | स्वतःच्या मालकीची दुचाकी असणे हे प्रत्येकसामान्य नागरिकाचे स्वप्न असते. बाजारात अनेक कंपन्यांच्या गाड्या उपलब्ध असतात. यामध्ये ‘रॉयल एनफिल्ड’ म्हणजेच बुलेटची वेगळीच क्रेझ आहे. आपल्या दमदार बाईक्ससाठी रॉयल एनफिल्ड (Raoyal Enfield ) कंपनी सुप्रसिद्ध आहे. रॉयल एनफिल्ड ही कंपनी भारतात सर्वात आधी डिझेल बाईक (Disel Bike लाँच करणारी कंपनी होती.

रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक

दरम्यान रॉयल एनफिल्ड कंपनी आता थेट इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. या कंपनीचे सीईओ बी. गोविंदराजन यांनी नुकतीच या बाईकबद्दल महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. पुढच्या वर्षांपर्यंत ही बाईक लाँच होऊ शकते. या बाईकला ‘कोडनेम एल’ असे नाव देण्यात आले आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

रॉयल एनफिल्डचा ईव्ही प्रवास सध्या टॉप गिअरमध्ये

“इलेक्ट्रॉनिक व्हेहिकल्सच्या प्रवासात आम्ही सातत्याने प्रगती करत आहोत. रॉयल एनफिल्डचा ईव्ही प्रवास सध्या टॉप गिअरमध्ये आहे. रॉयल एनफिल्डचा मजबूत डीएनए आणि इलेक्ट्रिक फीचर्स हे एकत्र करून एक खास इलेक्ट्रिक बाईक बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” असे रॉयल एनफिल्ड कंपनीचे सीईओ गोविंदराजन यांनी म्हंटले आहे.

रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईकची सिरीज येणार

रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईकची एक संपूर्ण सीरीज असणार आहे. या सीरीजमधील गाड्यांना एल१ए, एल१बी आणि एल१सी अशी नावं देण्यात आली आहेत. आपल्या इतर ‘क्लासिक’ थीम असलेल्या गाड्यांप्रमाणेच या इलेक्ट्रिक गाड्यांचे डिझाईन असणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

कंपनीने गुंतवले एक हजार कोटी

रॉयल एनफिल्डच्या चेन्नईमधील प्लांटमध्ये या इलेक्ट्रिक बाईक्स तयार करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कंपनीने शहराबाहेर ६० एकर जमीन ताब्यात घेतली आहे. तसेच, या प्रोजेक्टमध्ये पुढील एक ते दोन वर्षांमध्ये सुमारे एक हजार कोटी रुपये गुंतवण्याची कंपनीची योजना आहे.

Royal enfield is going to launch electric bike

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button