ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Jio data plan | अवघ्या ६१ रुपयांत घ्या अमर्याद डेटाचा आनंद ! जिओचा हा स्वस्तात मस्त प्लॅन आलाय चर्चेत

Jio data plan|दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. याचा चटका मात्र सर्वसामान्य लोकांना बसतोय. माणसाच्या रोजच्या आयुष्यातील गोष्टी ज्या पद्धतीने महाग झाल्या आहेत त्याच प्रमाणे मोबाईल फोनचे रिचार्ज देखील महाग झाले आहेत. मात्र महागाईच्या याकाळात सामान्य माणसाला जिओ या दूरसंचार कंपनीचा आधार आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

जिओ देते कमी खर्चात अधिक फायदे

आपल्या स्वस्त आणि मस्त रिचार्ज प्लॅन्ससाठी (Recharge Plans) जिओ विशेष प्रसिद्ध आहे. जिओ आपल्या ग्राहकांना कमी खर्चात अधिक फायदे देण्यासाठी अनेक प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) लाँच करते. यामध्ये अनेक प्लॅन्सचा समावेश आहे. जिओचे डेटा प्लॅन्स सुद्धा इतर कंपन्यांच्या तुलनेत किफायतशीर आहेत.

६१ रुपयांच्या प्लॅन मध्ये झाला बदल

आपल्या प्लॅनचा डेटा संपल्यावर हे पॅक उपयोगी पडतात. जिओ कंपनीने आपल्या अनेक डेटा पॅकमध्ये आता बदल केले आहेत. यापूर्वी जिओ कंपनी आपल्या ६१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६ जीबी डेटा देत होती. मात्र आता या पॅकमध्ये बदल करण्यात आला असून
ग्राहकांना अधिक डेटाचा लाभ देण्यात येत आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

मिळणार असा लाभ

जिओने ६१ रुपयांच्या डेटा पॅकमध्ये आधी ६ जीबी डेटा दिला जात होता. मात्र, आता या पॅकसोबत अतिरिक्त ४ जीबी डेटाही दिला जात आहे. यानंतर जिओच्या यूजर्सना ६१ रुपयांमध्ये १० जीबी डेटा मिळणार आहे. या पॅकची वैधता तुमच्या सक्रिय योजनेच्या वैधतेसारखीच असेल. १०GB हायस्पीड डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, इंटरनेट स्पीड ६४Kbps पर्यंत मर्यादित होईल.

Jio launched data plan of 61rs with 1GB data

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button