ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Tractor Subsidy Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर निम्म्या किंमतीत मिळणारं ट्रॅक्टर, त्वरित करा अर्ज

Tractor Subsidy Yojana| केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांच्या (Yojana) माध्यमातून शेतीसाठी तसेच शेती अवजारांसाठी अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच शेतीतील मेहनतीसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची (Tractor Subsidy) गरज भासते. परंतु, आजच्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना शेतीतील मशागतीसाठी खूप पैसे मोजावे लागतात. म्हणूनच शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान (Tractor Subsidy) देण्यात येते आहे. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

निम्म्या किमतीत मिळणार ट्रॅक्टर
आता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्त गेल्यानंतर साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया हा शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर (Tractor Subsidy Yojana) खरेदीसाठी शुभ मुहूर्त ठरेल. तर कृषी यांत्रिकी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करता येईल. तर कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुसुचित जाती जमातीमधील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळते. तसेच इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर मिळतो. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या घरी नवा कोरा ट्रॅक्टर आणावा. यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित महाडीबीटी फार्मर स्कीम या पोर्टलवर अर्ज करावा.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 (satbara) व 8 अ
  • बँक पास बुक
  • आधार कार्ड
  • यंत्राचे कोटेशन
  • परिक्षण अहवाल
  • जातीचा दाखला
  • विविध औजारांसाठी अनुदानाची रक्कम किती आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

काय आहे पात्रता आणि अटी?

  • एका शेतकऱ्याला फक्त एकाच ट्रॅक्टरचा लाभ घेता येतो.
  • शेतकरी अनुसूचित जाती वर्गामधील असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा (yojana)फायदा केवळ एकच अवजारासाठी देण्यात येतो.
  • म्हणजे राज्य शासनाद्वारे देण्यात येणारे अनुदान फक्त एकाच औजारासाठी देण्यात येते. उदाहरणार्थ (ट्रॅक्टर अवजारे / यंत्र )
  • आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीकडे जर ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभार्थी व्यक्ती पात्र मानण्यात येईल.
  • मात्र त्यासाठी ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
  • जर एखाद्या लाभार्थी व्यक्तीने अवजारासाठी लाभ घेतला असेल परंतु त्याच अवजारासाठी किमान 10 वर्षे तरी अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येतो.
  • एखाद्या शेतकऱ्याने या आधी जर एखाद्या कृषी अनुदानाचा लाभ घेतला असल्यास त्याला ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक.
  • या योजनेचा (Yojana)लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers, on the auspicious occasion of Akshaya Tritiya, tractors will be available on 50 percent subsidy under this scheme, apply immediately

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button