ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Irrigation Wells | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सिंचन विहिरींसाठी 100 टक्के अनुदानासाठी मंजुरी, जाणून घ्या सविस्तर

Irrigation Wells | Important news for farmers! Approval for 100 percent subsidy for irrigation wells, know in detail

Irrigation Wells | वाशीम जिल्ह्यातील मानोरा, मंगरूळपीर आणि कारंजा या तीन तालुक्यांमध्ये सिंचन विहिरींसाठी (Irrigation Wells) प्रशासकीय मंजुरीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल संबंधित गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना जिल्हा प्रशासन प्राधान्य देत आहे. यामध्ये सिंचन विहिरींच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.

  • उद्दिष्टापेक्षा जास्त कामगिरी:
  • मानोरा तालुक्यात १९२५ विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २४१२ विहिरींना प्रशासकीय मंजुरी देत १२५ टक्के काम पूर्ण झाले.
  • मंगरूळपीर तालुक्यात १९०० विहिरींचे उद्दिष्ट असताना २२०० विहिरींना मंजुरी देण्यात आली. हे ११५ टक्के कामगिरी दर्शवते.
  • कारंजा तालुक्यात २२७५ विहिरींचे उद्दिष्ट असताना २२५० विहिरींना मंजुरी देऊन ९९ टक्के उद्दिष्ट्यपूर्ती झाली.
  • या यशाबद्दल संबंधित गटविकास अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामाचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे.

वाचा | Agriculture Scheme | आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 50 कोटींचा फळबाग अनुदान निधी येणार

  • सिंचन विहिरींमुळे शेतकऱ्यांना फायदा:
  • सिंचन विहिरींमुळे शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढून पिकांचे उत्पादन वाढविण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते.
  • जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न:
  • जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना सिंचन विहिरी बांधण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय मंजुरी प्रक्रियेत सुलभता करणे, शेतकऱ्यांना जागरूक करणे आणि आर्थिक मदत पुरवणे यांचा समावेश आहे. सिंचन विहिरींसाठी प्रशासकीय मंजुरीचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करणं हे जिल्हा प्रशासन आणि संबंधित कर्मचारी यांच्या प्रयत्नांचे यश आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Web Title | Irrigation Wells | Important news for farmers! Approval for 100 percent subsidy for irrigation wells, know in detail

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button