ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

अपघाती मृत्यूनंतर कामगारांना मिळतात तब्बल 5 लाख रुपये, “या” शासनाच्या मदतीपासून कित्येक कामगार वंचित…

Workers get Rs 5 lakh after accidental death, many workers are deprived of the help of "Yaa" government.

बांधकाम कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना मिळणाऱ्या लाभाविषयी माहिती असायला हवी. बांधकाम कामगारांचा तसेच असंघटित कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास पात्र लाभार्थ्यांना शासनातर्फे (government) मदत दिली जाते. असंघटित कामगारांसाठी शासनाने (government) स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे.

याअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा (scheme) लाभ दिला जातो. जिल्ह्यात एक लाख ३८ हजार ८६२ बांधकाम कामगारांची नोंद आहे. अनेकजण नोंदणीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा कामगारांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला शासनातर्फे (government) मदत दिली जाते. मात्र याबाबत कामगारांना माहितीच नसल्याने जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयाकडे केवळ एकच प्रस्ताव आला आहे. त्याची पडताळणी केल्यानंतर त्यांना योग्य लाभ दिला जाणार आहे.

हे ही वाचा –केंद्र सरकारचा निर्णय; मराठवाड्यात हवामानाची अचूक माहिती देणारे “डॉप्लर रडार” बसवण्यात येणार

या योजनेबद्दल माहीत असायला हवे-

जिल्ह्यात केवळ एक लाख ३८ हजार कामगारांची नोंदणी
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार आहेत. मात्र बहुतांशजण नोंदणी करण्याकडे तसेच नूतनीकरण करण्याकडे कानाडोळा करतात. जिल्ह्यात अनेक प्रकारचे कामगार आहेत. मात्र बहुतांशजण कामगार कार्यालयात नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष करतात. नोंदणीकृत कामगारांसाठी शासनातर्फे (government) विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा (scheme) लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार कार्यालयात जाऊन किंवा ऑनलाईन (online) पद्धतीद्वारे नोंदणी करा.

हे ही वाचा –शेतकऱ्यांना सरकारकडून स्मार्टफोनसाठी 1500 रुपये; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सरकारचा प्रयत्न..

अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये-

जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या एखाद्या असंघटित कामगाराचा कामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाला किंवा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा लाभ राज्य सरकारकडून (state government) दिला जातो. यासाठी कामगार विभागाकडे तशी नोंदणी व पोलीस नोंद जोडण्याची आवश्यक आहे.

हे ही वाचा –

शेतकरी मुलांनो, तुम्हाला शैक्षणिक कर्ज घेयचे आहे? तर या सोप्प्या प्रक्रियेने आता सहज कर्ज मिळणार..

फक्त 70 रुपये किंमत असलेल्या या शेअर बद्दल माहीत आहे का? हा शेअर देईल तुफान पैसा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button