ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Construction Of Irrigation Wells | “या” जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! आठ हजार २५० सिंचन विहिरींचे बांधकाम होणार, जाणून घ्या अर्ज कसा करायचा ?

Construction Of Irrigation Wells | Great news for farmers in this district! Eight thousand 250 irrigation wells will be constructed, know how to apply?

Construction of irrigation wells | अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरींच्या बांधकामाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात ८,२५० सिंचन विहिरींचे बांधकाम केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Construction of irrigation wells) सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध होणार आहे.

सिंचन विहिरींच्या बांधकामासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया १५ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात अकोला तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत क्षेत्रात १,४५५ विहिरी, अकोटमध्ये ८५ ग्रामपंचायतीत १,२७५, बाळापूर ६६ ठिकाणी ९९०, बार्शीटाकळी ८२ ठिकाणी १,२३०, मूर्तिजापूर ८६ ठिकाणी १,२९०, पातूर ५७ ठिकाणी ८५५ आणि तेल्हारा तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ८५५ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

वाचा : Cheap Wheat Flour Yojna | स्वस्त गव्हाचे पीठ विकण्याची केंद्र; सरकारची नवीन योजना, वाचा सविस्तर माहिती!

शेतकऱ्यांना सिंचन विहिरींसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, ८-अ उतारा, सातबारा उतारा, जॉब कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

याशिवाय, जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी शेततळे आणि शोषखड्डे (जलतारा) बांधण्यासाठी देखील उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला १० शेततळ्याचे आणि ५० शोषखड्डे (जलतारा) चे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन त्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

या योजनेचे फायदे

  • शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध होईल.
  • शेती उत्पादनात वाढ होईल.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
  • जिल्ह्यातील आर्थिक विकासाला चालना मिळेल.

हेही वाचा :

Web Title :

Construction Of Irrigation Wells | Great news for farmers in this district! Eight thousand 250 irrigation wells will be constructed, know how to apply?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button