ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Midsummer Rain | वळवाच्या पावसाने नागरिकांना दिलासा ; या ठिकाणी गारांसह वरुणराजांचे झाले आगमन

Midsummer Rain |बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाल्याने महाराष्ट्रात कधी मान्सून (monsoon) दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मागील काही दिवसांत राज्यात तापमान प्रचंड वाढले आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच लोक वळवाचा पाऊसाकडे डोळे लावून होते. काल कराड-पाटण याठिकाणी वळवाचा पावसाने दमदार हजेरी लावली.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

वादळी पावसाने लावली हजेरी

कराड-पाटण तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून हवेतील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे गरमी वाढली होती. काल (ता.२३) दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाने याठिकाणी हजेरी लावली. यावेळी आकाशात विजा चमकत असल्याने आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. प्रचंड उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

पावसामुळे लोकांची उडाली तारांबळ

मात्र पावसामुळे शहरातील भाजी मंडईत शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ होत आहे. तसेच कराड-पाटण या भागात अनेक ठिकाणी नुकसान देखील झाले आहे.

१) चचेगाव येथे नारळाच्या झाडावर वीज पडून नुकसान झाले.
२) उत्तर कोपर्डे ग्रामपंचायतीसमोर कराड-मसूर या मुख्य रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
३) नडशी कॉलनी येथील काही घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी शेडवर झाडे पडून नुकसान झाले.
४) तासवडे-शिरवडे पुलालगत झाड पडल्याने महामार्गाकडून येणारी वाहतूक रखडली
५) गारपिटीमुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Midsummer rain gives comforter to people

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button