ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Cereal Production | तृणधान्य लागवडीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १०० टक्के अनुदानावर किट ! ८ लाख कुटुंबांना होणार फायदा …

Cereal Production |जागतिक पातळीवर यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. परंतु, जगभरात तृणधान्याचा तुटवडा आहे आणि
राज्यात देखील तृणधान्याचे उत्पादन कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तृणधान्य पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील आठ लाख शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर किट दिली जाणार आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

राज्यात तृणधान्याचे उत्पादन कमी

आपण सध्या अत्यंत धावपळीचे जीवन जगत आहोत. या जीवनात आपले आराेग्य उत्तम राखण्यासाठी तृणधान्य हे पौष्टिक धान्य म्हणून ऊर्जा प्रदान करते. यामध्ये ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा आणि कोदो या धान्यांचा समावेश होतो. म्हणून जगभरात या धान्याची मागणी वाढली आहे. तृणधान्याची मागणी वाढत असताना राज्यात त्याचे उत्पादन मात्र शून्य होण्याच्या वाटेवर आहे.

१०० टक्के अनुदानावर मिळणार मिनी किट

शेतकरी शेतात अशा धान्याची लागवड करण्यासाठी टाळाटाळ करतात. बाजारात या धान्याला मागणी असतानाही याचे उत्पादन होत नाही, ही बाब लक्षात येताच कृषी विभागाने याच्या मिनी किट तयार केल्या आहेत. या किट १०० टक्के अनुदानावर राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

किटमध्ये असणारे धान्य

खरीप ज्वारी – २०० ग्रॅम
बाजरी- १०० ग्रॅम
राजगिरा- १०० ग्रॅम
राळा- २०० ग्रॅम
कोदो- २०० ग्रॅम

या किटमधून उत्पादित धान्य शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वापरता येतात. तसेच यामधून बियाणे तयार करून पुढील दोन वर्षे शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तृणधान्याचे बियाणे घरीच तयार करता येणार आहे. कृषी विभागाने अशा आठ लाख किट तयार केल्या असून त्या राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत.

Agriculture department will provide kit for cereal production on 100 percent subcidy

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button