ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | राज्यात आज उष्ण व दमट हवामानाचा अंदाज ! दोन-तीन दिवसांत मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता

Weather Update |राज्यातील नागरिक उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. सध्या राज्याच्या कमाल तापमानात थोडीशी घट झाली असली तरी तापमान आणि उकाडा
मात्र कायम आहे. या वाढलेल्या उन्हाच्या चटक्याने विदर्भ पोळला आहेच. मात्र उर्वरित राज्यातही झळा कायम आहेत. आज (ता. २७) राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात (Tempreture) चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

उकाड्यातील वाढ कायम

काल (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भामधील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर वर्धा, गोंदिया, अकोला, नागपूर येथील कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. दरम्यान राज्यात कोकण वगळता उर्वरित ठिकाणी तापमान ३५ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका आणि दमट हवामान यामुळे उकाड्यातील वाढ कायम आहे

पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण

सध्या दक्षिण हरियाणापासून सिक्कीमपर्यंत पूर्व-पश्चिम, तसेच मध्य प्रदेशपासून, विदर्भ, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत दक्षिणेत्तर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. आज (ता. २७) राज्यात उष्ण व दमट हवामानामुळे चटका आणि उकाडा कायम राहणार आहे. तसेच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

मॉन्सूनमध्ये प्रगती होण्याची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांना सध्या मान्सूनचे वेध लागले आहेत. मागील आठवड्यात दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी हजेरी लावली. त्यानंतर तब्बल आठवडाभरापासून मॉन्सूनच्या वाटचालीत बदल झालेला नाही. येत्या दोन ते तीन दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्राच्या आणखी काही भागासह अंदमान बेटांच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

Todays weather updates of maharshtra

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button