ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | अवकाळी पावसाचा इशारा! पुढील चार दिवस उत्तर भारतात ढगांची गर्दी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस…

Weather Update | Warning of untimely rain! Heavy cloud cover and thundershowers in North India for the next four days...

Weather Update | भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस उत्तर भारतात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. वायव्य सीमेवरून प्रवेश करणारे पश्चिमी वाऱ्यांचे झोत प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्रावरून येत आहेत. यामुळे 11 मार्चपासून 14 मार्चपर्यंत या भागांमध्ये ढगांची गर्दी आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच, ओडिशा आणि छत्तीसगढमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे.

हवामानातील बदलामुळे हे घडते:

हवामान खात्याच्या मते, वेटर्न डिस्टबर्न्सच्या प्रभावामुळे देशातील हवामानाचे चक्र बदलले आहे. त्यामुळे एकाच वेळी ऊन, पाऊस आणि थंडी अनुभवली जात आहे. ऐन हिवाळ्यातही अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

वाचा | Maratha Reservation | माराठ्यांना आरक्षण मिळाले ;पन त्या आरक्षणाचा फायदा मिळणार तरी कधी?

महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा फटका:

गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागांना अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलंच झोडपून काढलं होतं. या पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं.

शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब:

पुढील चार दिवस उत्तर भारतात होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि तूर यांसारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title | Weather Update | Warning of untimely rain! Heavy cloud cover and thundershowers in North India for the next four days…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button