ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Milk Subsidy | दूध उत्पादकांसाठी खुशखबर! खात्यावर तब्बल ६.८० लाख अनुदान जमा, लगेच पाहा तुम्हाला मिळाले का?

Milk Subsidy | Good news for milk producers! As much as 6.80 lakh subsidy deposited in the account, see immediately whether you got it?

Milk Subsidy | राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ रुपये प्रति लिटर अनुदान (Milk Subsidy) देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बारामती तालुक्यातील २५०० दूध उत्पादकांच्या खात्यावर ६ लाख ८० हजार ७९४ रुपये इतकी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे.

बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे यांनी ही माहिती दिली. संघाकडून दररोज २ लाख ७५ हजार लिटर दूध संकलन केले जाते. या योजनेत ७० प्राथमिक दूध संस्थांच्या आधिपत्याखालील २५०० दूध उत्पादकांचा समावेश आहे.

या अनुदानासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, दुग्ध विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्यासह संघातील उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) संजय भोसले, संगणक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे.

वाचा | Crop Water Management | शेतकऱ्यांनो उन्हाळ्यात होईल पाण्याची बचत अन् पीकही येईल जोमात; लगेच जाणून घ्या सोप्या टिप्स

उर्वरित दूध उत्पादकांनी लवकर अर्ज करावा:
संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन ढोपे यांनी उर्वरित प्राथमिक दूध संस्था आणि उत्पादकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या विहित नमुन्यातील दुधाची माहिती लवकर देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title | Milk Subsidy | Good news for milk producers! As much as 6.80 lakh subsidy deposited in the account, see immediately whether you got it?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button