ताज्या बातम्या

Maratha Reservation | माराठ्यांना आरक्षण मिळाले ;पन त्या आरक्षणाचा फायदा मिळणार तरी कधी?

Maratha Reservation | Marathas got reservation; but when will they get the benefit of that reservation?

Maratha Reservation | मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा शासन निर्णय झाला तरीही, अद्याप मराठा तरुणांना जातीचा दाखला मिळण्यास अडचणी येत आहेत. गृह विभागाकडून 17 हजार पोलिसांची भरती सुरू असून 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. मात्र, जातीच्या दाखल्यासाठी 45 दिवस आणि नॉन क्रिमिलेयरसाठी 15 दिवसांची मुदत असल्यामुळे मराठा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातूनच अर्ज करावा लागत आहे.

राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पण, महसूल विभागाच्या जात प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेत ‘एसईबीसी’चा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे आरक्षणास (Maratha Reservation) पात्र विद्यार्थ्यांना आणि तरुणांना नॉन क्रिमिलेयर किंवा जातीचा दाखला मिळण्यास अडचणी येत आहेत.

नॉन क्रिमिलेयर मिळण्यासाठी 15 दिवस आणि जातीच्या प्रमाणपत्राची मुदत 45 दिवसांची आहे. पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता केवळ 25 दिवसच आहे. त्यामुळे आरक्षण देऊनही त्याचा फायदा मराठा तरुणांना होणार नाही. जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांना अद्याप टाळेच आहेत आणि आपले सरकार सेवा केंद्रे देखील बहुतांश बंद आहेत.

वाचा | Weather Update | मोठी बातमी! महाराष्ट्रात थंडी वाढणार, गारपीटीचीही शक्यता !

उपाययोजना काय?

महसूलच्या ऑनलाइन पोर्टलवर एसईबीसीचा पर्याय उपलब्ध झाल्यास लगेच दाखले मिळतील. ऑनलाइन पोर्टलला नवीन प्रवर्ग समाविष्ट झाल्याशिवाय उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जात नाही.

महसूल विभागाचे म्हणणे:

ज्यावेळी महसूलच्या ऑनलाइन पोर्टलला एसईबीसीचा पर्याय येईल, त्यावेळी संबंधितांना काही दिवसांत दाखले देण्याचे नियोजन निश्चितपणे केले जाईल.

मराठा तरुणांची चिंता:

आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मराठा तरुणांना किती दिवस वाट पाहावी लागणार? यासंदर्भात सरकार पातळीवरून किंवा जिल्हा प्रशासनाकडून काय उपाययोजना केली जाणार?

Web Title | Maratha Reservation | Marathas got reservation; but when will they get the benefit of that reservation?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button