ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
Tech

Royal Enfield Classic 350 | रॉयल एनफिल्ड क्लासिक 350; जाणून घ्या सविस्तर ,नवीन फीचर्स आणि किंमत …

Royal Enfield Classic 350 | Royal Enfield Classic 350; Know details, new features and price...

Royal Enfield Classic 350 | रॉयल एनफिल्ड लवकरच आपली लोकप्रिय (Royal Enfield Classic 350) क्लासिक 350 बाईक नवीन आवृत्तीमध्ये लाँच करणार आहे. ही बाईक चाचणीदरम्यान स्पॉट झाली आहे आणि त्यामध्ये अनेक नवीन फीचर्स दिसून येत आहेत.

या नवीन आवृत्तीमध्ये लांब हँडलबार आणि फ्लोटिंग रीअर सीट असण्याची शक्यता आहे. यातील मागील सीट सहज काढण्याजोगे असू शकते. या नवीन बाईकमध्ये विंटेज व्हाईट वॉल व्हिल्स, बाईकच्या उजव्या बाजूला हार्ड पॅनियर माउंट आणि इंजिन गार्ड हे फीचर्स असण्याची शक्यता आहे. रॉयल एनफिल्डकडून अतिरिक्त किंमतीत क्रॅश गार्ड देण्याची शक्यता आहे.

इंजिनाच्या बाबतीत, या नवीन (Royal Enfield Classic 350) क्लासिक 350 मध्ये हंटर, मेटिअर आणि बुलेट सारखीच J सीरीज, 349cc सिंगल सिलेंडर मोटर वापरण्यात येणार आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह येणार आहे. जे 20.2bhp पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करते.

हार्डवेअरच्या बाबतीत, या नवीन बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, ड्युअल रिअर शॉक, दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक आणि रोड-बायस्ड टायर्ससह स्पोक व्हील देण्यात आले आहे.

वाचा : Royal enfield | खुशखबर ! रॉयल एनफिल्डची ‘इलेक्ट्रिक बुलेट’ येणार रे sss ; जाणून घ्या बाईकच्या डिझाईन आणि इतर गोष्टींबद्दल

या (Royal Enfield Classic 350) नवीन क्लासिक 350 ची किंमत जवळपास २ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही बाइक या वर्षात लाँच होण्याची शक्यता आहे.

या नवीन फीचर्समुळे (Royal Enfield Classic 350) रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही बाईक आणखी आकर्षक आणि चांगली झाली आहे. या नवीन बाईकची किंमतही वाजवी आहे. त्यामुळे ही बाईक भारतीय बाजारात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

Web Title | Royal Enfield Classic 350 | Royal Enfield Classic 350; Know details, new features and price…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button