Tech

LPG Bike | नादचखुळा! देसी जुगाडवाली ‘ही’ बाइक फक्त 50 पैशांत धावतेय 1 किमी, जाणून घ्या सविस्तर …

LPG Bike | Nadachkhula! Desi Jugadwali is offering 'this' bike for 50 paisa for 1 km, know in detail

LPG Bike | सोशल मीडियावर एलपीजीवर चालणाऱ्या बाईकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गुजरातचा असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये काही लोक आपल्या जुन्या बाईकमध्ये (LPG Bike) एलपीजी सिलिंडर फिट करून चालवत आहेत. विशेष म्हणजे, एलपीजीवर चालणारी ही बाईक 150 किलोमीटरपर्यंत मायलेज देते आणि पेट्रोलच्या तुलनेत 1/4 खर्चिक आहे.

व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या बाईकमध्ये 2 किलो एलपीजी सिलिंडर(LPG Gas bike) बाईकच्या मागे डब्ब्यासारख्या कॅबिनेटमध्ये फिट केले आहे. या सिलिंडरमधून निघणारे पाईप आतूनच बाईकच्या इंजिनपर्यंत पोहोचते. व्हिडिओमध्ये दिसतं आहे की, बाईकचा पेट्रोल टँक बंद असूनही बाईक चालते आहे.

एलपीजीवर चालणारी ही बाईक 2 किलो गॅसमध्ये 150 किलोमीटरपर्यंत चालू शकते. याचा अर्थ गॅसने बाईक चालवण्याचा खर्च केवळ 50-60 पैसे प्रति किलोमीटर आहे. तर पेट्रोलने चालणाऱ्या सामान्य बाईकवर 2-3 रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो.

वाचा | ATM Card Insurance | काय सांगता? एटीएम कार्डवर मिळणार तीन कोटी; लगेच जाणून घ्या नेमकी काय आहे स्कीम…

बजाज लवकरच लॉन्च करणार सीएनजी बाईक

दुसरीकडे, प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नात बजाज ऑटोने लवकरच सीएनजीवर चालणारी मोटरसायकल लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने नुकतीच सीएनजीवर (High mileage bike) चालणाऱ्या बाईकची डिझाइन स्केच जारी केली होती. बजाजची येणारी सीएनजी बाईक पल्सर किंवा प्लॅटिना मॉडलवर लॉन्च होऊ शकते. या बाइकमध्ये ड्यूअल-फ्यूल टेक्नॉलॉजीचा वापर करण्याविषयी सांगण्यात आलंय. जी पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर काम करेल.

एलपीजी आणि सीएनजी बाईकचे फायदे:

  • पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्चिक
  • प्रदूषण कमी करते
  • चांगले मायलेज

तोटे:

  • बाईकमध्ये सिलिंडर फिट करण्यासाठी मॉडिफिकेशनची आवश्यकता
  • सिलिंडरमुळे वजन वाढते
  • सर्व पेट्रोल पंपांवर एलपीजी आणि सीएनजी उपलब्ध नाही

Web Title | LPG Bike | Nadachkhula! Desi Jugadwali is offering ‘this’ bike for 50 paisa for 1 km, know in detail

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button