Tech

Maruti Baleno | काय सांगता? ६ एअरबॅग्स असलेली ‘ही’ कार 1 लिटर पेट्रोलमध्ये धावते 30 किमी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Maruti Baleno | what do you say 'This' car with 6 airbags runs 30 km on 1 liter of petrol, know the price and features

Maruti Baleno | भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम फीचर्स आणि डिझाईन असलेल्या कार उपलब्ध आहेत. परंतु सामान्य माणसाला कमी किमतीत धावणारी आणि देखभाल कमी असणारी कार हवी असते. मारुती सुझुकी बलेनो (Maruti Baleno) अशीच एक कार आहे जी भारतीय बाजारपेठेत उत्कृष्ट इंजिन आणि कामगिरीमुळे लोकांची मने जिंकत आहे.

इंजिन आणि मायलेज
मारुती बलेनोमध्ये १.२-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ९० bhp पॉवर आणि ११३ Nm टॉर्क जनरेट करते. कंपनी सीएनजी आवृत्तीमध्येही बलेनो ऑफर करते. बलेनो ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्सच्या पर्यायासह उपलब्ध आहे. पेट्रोलमध्ये बलेनो २२.९४ किमी आणि सीएनजीमध्ये ३०.६१ किमी मायलेज देते.

फीचर्स
सुरक्षिततेच्या दृष्टीने, या कारमध्ये ६ एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल-होल्ड असिस्ट, सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीट बेल्ट, मागील पार्किंग सेन्सर आणि ३६० डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

वाचा | Flying Car in India | आकाशात उडणारी इलेक्ट्रिक गाडी! वाचा मारुती सुझुकीची नवीन कार हवेत उडणारी कार लाँच..

बूट स्पेस आणि व्हेरिएंट
बलेनोमध्ये ३१८ लीटरची बूट स्पेस आहे. मारुती बलेनो चार प्रकारांमध्ये खरेदी केली जाऊ शकते: सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा.

किंमत
मारुती बलेनोची किंमत ६.६६ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ९.८८ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Web Title | Maruti Baleno | what do you say ‘This’ car with 6 airbags runs 30 km on 1 liter of petrol, know the price and features

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button