Tech

Electric Luna | काय सांगता? फक्त एका चार्जमध्ये मुंबई ते लोणावळा गाठणारी ही इलेक्ट्रिक लूना आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…

Electric Luna | what do you say This electric Luna that reaches Mumbai to Lonavala in just one charge will be launched today; The price is just…

Electric Luna | आज कायनेटिक ग्रीन (Kinetic Green) यांनी त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक मोपेड ‘ई-लूना’ (E-Luna) लाँच केली आहे. 26 जानेवारीपासून बुकिंग सुरु झालेल्या या मोपेडला ग्राहकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी बुकिंग बंद करण्याची वेळ कंपनीवर आली होती. 500 रुपयांच्या टोकन रक्कमेत बुकिंग सुरु असलेली ही मोपेड आता ग्राहकांना 71,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत (Electric Luna Price) उपलब्ध होणार आहे.

ई-लूनाची वैशिष्ट्ये:

  • 2kWh क्षमतेची लिथिअम आयर्न बॅटरी
  • 110 किमीची एका चार्जमधील रेंज
  • 50 किमी प्रति तास टॉप स्पीड
  • पोर्टेबल चार्जर
  • 4 तासात पूर्ण चार्जिंग
  • ट्यूब टायर
  • 22NM टॉर्क
  • डिजिटल कंसोल
  • कॉम्बी ड्रम ब्रेक
  • टेलिस्कॉपिक फ्रंट आणि ड्युअलशॉक रीअर सस्पेंशन
  • 1.985 मीटर लांबी, 0.735 मीटर रुंदी आणि 1.036 मीटर उंची
  • 760 मिमी सीट उंची
  • 96 किलो वजन
  • 170 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स

वाचा | New E-scooter Launch | नादचखुळा! बाजारात आली नवी ई-स्कूटर; 200Km च्या रेंजची मिळणार एक्स्ट्रा बॅटरी, किंमत तर फक्त….

खरेदी पर्याय:

ग्राहक 2500 रुपयांच्या मासिक हफ्त्यावरही ही मोपेड खरेदी करू शकतात. सुरुवातीला 50 हजार ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

उत्पादन आणि उपलब्धता:

ई-लूनाचे (Electric Luna) उत्पादन अहमदनगर येथे केले जाणार आहे. सुरुवातीला दर महिन्याला 5000 युनिट्सचे उत्पादन केले जाईल आणि मागणीनुसार ते वाढवले जाईल.

कायनेटिकची प्रसिद्ध लूना आता इलेक्ट्रिक अवतारात ग्राहकांसमोर आली आहे. आकर्षक वैशिष्ट्ये आणि किंमत यांच्यामुळे ही मोपेड बाजारात यशस्वी ठरण्याची शक्यता आहे.

Web Title | Electric Luna | what do you say This electric Luna that reaches Mumbai to Lonavala in just one charge will be launched today; The price is just…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button