ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
Tech

Wonder Bike | तेजपूरच्या तरुणानं विकसित केली ‘वंडर बाईक’, ८ रुपयांत ३० किलोमीटर!

Wonder Bike | Tezpur youth developed 'Wonder Bike', 30 kilometers for 8 rupees!

Wonder Bike | आसाममधील तेजपूर शहरातील मस्कुल खान नावाच्या तरुणानं एक अद्भुत ‘वंडर बाईक’ विकसित केली आहे. ही बाईक खास बॅटरीवर चालते आणि केवळ ८ रुपये खर्चून ३० किलोमीटर अंतर पार करते. नुकतीच तेजपूर महामार्गावर या (Wonder Bike) बाईकचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं.

मस्कुल खान हा बारिकासुबुरी परिसरातील विद्यार्थी आहे. त्याने डिझाइन केलेल्या या बाईकला ‘वंडर बाईक २५०’ असं नाव देण्यात आलंय. खान यांच्या म्हणण्यानुसार, “ही स्पेशल बाईक केवळ ८ रुपयांमध्ये ३० किलोमीटर अंतर सहज पार करू शकते.” बाईकच्या अनोख्या नावाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “या ई-बाईकचं मॉडेल तुम्हाला कुठेही सापडणार नाही. त्यामुळे याला ‘वंडर बाईक’ असं नाव देण्यात आलंय.”

खान यांनी लॉकडाऊन दरम्यान घरी बसून एक ई-सायकल बनवली होती. आता त्यांनी त्यांची कल्पक बुद्धी वापरून या सायकलच्या मॉडेलमध्ये आणखी सुधारणा करत ही ई-बाईक बनवली आहे.

वाचा | Electric Bike | धडाडण 190 किमी तेही एका चार्ज मध्ये, ‘CSR 762’ इलेक्ट्रिक बाइक लाँच! किंमत फक्त एवढी च…

या ई-बाईकचं (Wonder Bike) वजन केवळ ३० किलो असून, तिच्यात ८०-१०० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. “ही बाईक बॅटरीनं चालते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त ५ तास लागतात”, असं मस्कुल खान यांनी सांगितलं.

मस्कुल खान यांनी त्यांच्या नावीन्यपूर्ण कौशल्याबद्दल बोलताना भविष्यात ई-कार बनवण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं. त्यांनी त्यांच्या नवकल्पनांचं श्रेय वडिलांना दिलं असून, त्यांनी माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला असल्याचं ते म्हणाले.

मस्कुल खान यांनी डिझाइन केलेल्या ‘वंडर बाईक’ने तेजपूरमध्ये विशेष लक्ष वेधलं आहे. यासह त्याची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा देखील होते आहे. आता ही बाईक व्यावसायिक स्तरावर बाजारात आणली जाते का, हे पाहणं बाकी आहे.

Web Title | Wonder Bike | Tezpur youth developed ‘Wonder Bike’, 30 kilometers for 8 rupees!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button