ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आर्थिक

Share Market | चढ-उतारानंतर शेअर मार्केट घसरणीसह बंद! निफ्टीचा २२२९७ च्या लाईफटाईम उच्चांकाला स्पर्श

Share Market | After ups and downs, the stock market closes with a decline! Nifty touches lifetime high of 22297

Share Market | शुक्रवारी शेअर बाजार दिवसभर चढ-उतारानंतर घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स १५ अंकांनी घसरून ७३,१४२ अंकांच्या (Share Market) पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ५ अंकांनी घसरून २२,२१२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दिवसभरात निफ्टीनं २२,२९७ चा आजवरचा उच्चांकी स्तर गाठला होता.

निफ्टी मिडकॅप १०० आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकाने वाढ नोंदवली, तर निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांकातही घसरण नोंदवली गेली, तर निफ्टी फार्मा किंचित वाढीसह बंद झाला.

बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाइफ, डॉ. रेड्डीज, टायटन, एचडीएफसी लाइफ, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एलटीआय माइंडट्री यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर बीपीसीएल, एचसीएल टेक, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, ओएनजीसी आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

वाचा | Indian Hotels Company Limited | टाटा समूहाच्या ‘या’ कंपनी ने 600 रुपयांचा टप्पा ओलांडला, नवीन उच्चांकी विक्रम!

एसबीआय लाइफ, डॉ. रेड्डीज, महिंद्रा, सिप्ला, रिलायन्स, अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या जिओ फायनान्शिअलच्या शेअरमध्ये कामकाजादरम्यान ११ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो ३३५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

पेटीएमच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली, तर स्टोव्ह क्राफ्ट, इंजिनिअर्स इंडिया, एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, टाटा टेक, युनि पार्ट्स आणि हिंदुस्तान झिंक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

एचडीएफसी बँक, पटेल इंजिनिअरिंग, एनएमडीसी लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, ग्लोबस स्पिरिट, कोटक महिंद्रा बँक, टाटा स्टील, उर्जा ग्लोबल, ॲक्सिस बँक, यूपीएल, एक्साइड इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, ओएनजीसी, ओम इन्फ्रा, देवयानी इंटरनॅशनल, ब्रँड कॉन्सेप्ट, पंजाब आणि सिंध बँक आणि कामधेनू लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली.

Web Title | Share Market | After ups and downs, the stock market closes with a decline! Nifty touches lifetime high of 22297

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button