ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
जॉब्स

राज्यातील लाखो तरुण-तरुणींना रोजगार मिळणार ; बेरोजगारी दुर करण्यासाठी सरकारने उचलले पाऊल !

बेरोजगारी (Unemployment) ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकारने आता पुढाकार घेतला आहे. मध्यंतरी दावोस दौऱ्यावर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रोजगार निर्मितीसाठी एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक येणार असल्याचे स्पष्ट केले होते. या अंतर्गत राज्यात १९ उद्योग उभारले जाणार आहेत. त्यातून आगामी वर्षभरात राज्यातील एक लाख सहा हजार ५४५ तरूण-तरूणींना रोजगार

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

महाराष्ट्रात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी १९ उद्योजकांशी करार

सध्या त्यातील १३ उद्योजकांची ७८ हजार ६६ कोटींची गुंतवणूक निश्चित झाली आहे. या उद्योजकांना जागा फायनल झाली असून त्यातून ५९ हजार ८९५ जणांना रोजगार मिळणार आहे. मध्यंतरी राज्यातील काही उद्योग परराज्यात गेल्यानंतर बेरोजगारांच्या रोजगाराची चिंता व्यक्त करण्यात आली होती. यावर पर्याय काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दावोस दौऱ्यावर गेल्यानंतर महाराष्ट्रात उद्योग यावेत म्हणून जवळपास १९ उद्योजकांशी करार केले होते.

उद्योगांसाठी सरकारकडून जागा वाटप

राज्यसरकारने सुमारे १३ उद्योजकांना सोलापूर, पुणे, औरंगाबाद, कोकण अशा ठिकाणी जागा दिल्या आहेत. यातील सात उद्योजगांना जागा वाटप करण्यात आले आहे. उर्वरित उद्योजकांना लवकरच जागा वाटप होईल. दरम्यान जागा वाटप झालेल्या ७ उद्योजकांकडून ५४ हजार ७३० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे काम काही दिवसांत सुरु होणार आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

राज्यातील तरुणांना रोजगार मिळणार

या उद्योगांमधून राज्यातील साडेपाच हजार तरूणांना रोजगार मिळणार आहे. यानंतर पुढील दोन महिन्यांत आणखी सहा उद्योजकांना जागा दिली जाणार आहे. या उर्वरित सहा उद्योजकांची जागा निश्चित झाली असून ‘एमआयडीसी’ कडून त्यांना जागा देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या उद्योजकांकडून अंदाजे ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्या उद्योगांमधून राज्यातील ४५ हजार ६५० तरूण-तरूणींना रोजगार मिळेल, असा विश्वास ‘एमआयडीसी’ने व्यक्त केला आहे.

More than one lakh yougsters from maharashtra will get employment

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button