ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Electricity Bill | आता Whatsapp वर भरा तुमचे वीजबिल ! वीजवितरण कंपनीने सुरू केली नवीन सुविधा

दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. गोष्टी अधिक वेगाने व सोयीस्कर व्हाव्या यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. दरम्यान सध्या संपूर्ण जग ऑनलाईन झाले आहे. यामुळे डिजिटल व्यवहारांना गती आली आहे. आजकाल ऑनलाइन पद्धतीने आर्थिक व्यवहार केले जातात. यामध्ये बिलिंगची (E-billing) सुविधा देखील उपलब्ध असते.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

व्हॉट्सअॅपवर वीजबिल भरता येणार

डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे बहुतेक कंपन्या आपली बिले भरण्यासाठी विविध सुविधा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या Whatsapp वर पेमेंट सुविधा सुरू झाली आहे. याचा फायदा आता वीजग्राहकांना सुद्धा होणार आहे. वीज ग्राहकांना आता व्हॉट्सअॅपवर वीजबिल ( Electricity Bill) भरता येणार आहे. यामुळे ग्राहकांसाठी वीज बिले भरणे अधिक सोपे होणार आहे. मध्यप्रदेश मध्ये नुकतीच ही सुविधा सुरू झाली आहे.

Whatsapp अकाउंटचा वापर करून भरा वीजबिल

महत्त्वाची बाब म्हणजे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वीजबिल भरणे अधिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपे आहे. ग्राहक त्यांच्या सध्याच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा ( Whatsapp Account) वापर करून कोणत्याही त्रासाशिवाय वीज बिल भरू शकतात. जाणून घेऊया कसे ?

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

व्हॉट्सअॅप वरून वीजबिल कसे भरावे ?

१) व्हॉट्सअॅप-पे पेमेंट फीचरच्या (Whatsapp pay payment ) माध्यमातून ग्राहक घरबसल्या सहजपणे बिल भरू शकतात.
२) सध्याच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा वापर करून ग्राहक ते आपल्या बँक खात्याशी लिंक करू शकतात.
३) त्याचबरोबर ज्या ग्राहकांकडे व्हॉट्सअॅप-पे सुविधा नाही, ते गुगल-पे, फोन-पे किंवा पेटीएम सारख्या इतर यूपीआय मोडद्वारेही व्हॉट्सअॅपवरून पैसे भरू शकतात.
४) व्हॉट्सअॅपवरून वीजबिल भरण्यासाठी अतिरिक्त डाऊनलोड किंवा नवीन नोंदणीची गरज नाही.
५) या नव्या सुविधेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना सेंट्रल झोन वीज वितरण कंपनीच्या 07552551222 टोल फ्री नंबर सेव्ह करून चॅटिंग सुरू करता येणार आहे.
६) व्ह्यू अँड पे बिल पर्यायाचा वापर करून, त्यांना पेमेंट पूर्ण करण्याच्या सूचनांसह प्रॉम्प्ट मिळेल. पेमेंट पूर्ण केल्यानंतर ग्राहकाला कन्फर्मेशन मेसेज येईल.

Electricity bill on whatsapp pay

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button