ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Onion Subsidy | कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील तब्बल 3 लाख 2 हजार 444 शेतकऱ्यांना मिळणार 756 कोटी अनुदान

Onion Subsidy | राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकवेळा शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याच पिकांपैकी एक असलेला पिक म्हणजे कांदा. कांदा पिकाचे नुकसान हे अनेक कारणांमुळे होते. अनेकवेळा कांद्याला भाव न मिळाल्यामुळे कवडीमोल भावाने विकला जाणारा कांदा तर अचानक उद्भवणारी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन कांदा पिकाचे उत्पादन घेत नाही. म्हणूनच कांदा (Onion Subsidy) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने कांद्याला अनुदान जाहीर केले आहे. मात्र, तुम्हाला हे कांदा अनुदान कोणत्या तारखेपर्यंत मिळणार हे माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊयात.

वाचाMaharashtra Cabinet Portfolio | ब्रेकिंग! अखेर खातेवाटप जाहीर; पाहा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कोणत्या मंत्र्याला मिळालं

शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान

राज्यातील 3 लाख 2 हजार 444 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता कांदा पीक अनुदान मिळणार आहे. तसेच, हे कांदा अनुदान 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे. कांदा अनुदानासाठी पात्र असलेले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी 755 कोटी 64 लाख रुपयांची गरज आहे. मात्र, अधिवेशनात 550 कोटी रुपयांची मागणी करण्यात आले होती. त्यामुळे उर्वरित रक्कमेची तरतूद लवकरात लवकर पूर्ण करून 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना कांदा अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

वाचाChatGPT | चाटजीपीटीने घरबसल्या तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! हे आहेत दोन पर्याय, कसं ते जाणून घ्या सविस्तर

कांदा अनुदानाची स्थिती:
अनुदानासाठी पात्र शेतकरी किती आहेत?
3,02,444

अनुदानाची रक्कम किती आहे?
755.64 कोटी

अनुदान कधी मिळणार?
15 ऑगस्टपर्यंत मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for onion growers! As many as 3 lakh 2 thousand 444 farmers of the state will get 756 crore subsidy till ‘this’ date

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button