ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Advisory | शेतकऱ्यांनो राज्यात सर्वत्र ठिकाणी होणार पाऊस! पण कसा हलका की मुसळधार? जाणून घ्या पिक निहाय कृषी सल्ला

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभागच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिनांक 19 ते 25 जुलै दरम्यान आकाश मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 19, 20, 21, 22 व 23 जुलै रोजी सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. तर 24 व 25 जुलै रोजी सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चला तर मग शेतकरी मित्रांनो पिक निहाय कृषी सल्ला (Agricultural Advisory) जाणून घेऊयात.

कपाशी
पिक क्षेत्रात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा
करावा. पिक उगवणीनंतर तन व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक
सोडियम 10% ईसी 12.5 मिली ते 15 मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन
नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल 5% ईसी 15 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये
पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी.

वाचा: Agribusiness | शेतकऱ्यांना मालामाल सुवर्णसंधी! ‘या’ झाडाची फक्त पाने विकून शेतकरी कमवू शकतात लाखो रुपये, जून ते जुलै महिन्यात करतात शेती

सोयाबीन
मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार
नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. ज्या शेतकरी बांधवांची
सोयाबीन पेरणी राहिली असल्यास, त्यांनी सोयाबीन पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर 30 सेंमी पर्यंत कमी
करून तसेच बियाणे दर हा प्रती हेक्टरी 90 ते 100 किलो बियाणे पर्यंत वाढवून पेरणी हि ह्या आठवड्या
अखेर करावी. उशिरा सोयाबीन पेरणी करणाऱ्या शेतकरी बांधवांनी कमी कालावधीच्या जेएस-20-34,
एनआरसी 130, एनआरसी 131, एनआरसी 138 या सारख्या सोयाबीन वाणांच्या लागवडीस प्राधान्य द्या.

भात
धान पिकाचे रोपे / पर्हे २१ ते २५ दिवसांचे झाले असल्यास रोवणी करावी. मित्र किडींच्या डीं संवर्धनासाठी
धान बांधावर झेंडू व चवळी पिकाची लागवड करावी.
रोपवाटीका: खोडकिडा व गादमाशीच्या
व्यवस्थापनाकरिता कार्बोफ्युरॉन 3% दानेदार 25 किलो ग्रॅम प्रति हेक्टर (कार्बोफ्युरॉन 3% दानेदार 250
ग्रॅम प्रति 100 वर्ग मीटर रोपवाटीका) रोपकाढणीच्या 5 दिवस अगोदर रोपवाटीकेत टाकावे. धान
रोपवाटीका तण विरहीत ठेवावी.

तूर
मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार
नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

मुग
मुग पिकाची सलग पीक म्हणून पेरणी टाळावी. मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील पावसाचा
अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा
निचरा करावा.

उडीद
उडीद पिकाची सलग पीक म्हणून पेरणी टाळावी. मागील आठवड्यात झालेला पाऊस व पुढील
पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त
पाण्याचा निचरा करावा.l

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers, there will be rain everywhere in the state! But how light or heavy? Know crop wise agriculture advice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button