ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

El Nino | शेतकऱ्यांवर मोठं संकट! एल निनोचा मान्सूनला मोठा फटका; अमेरिकेत झालं आगमन, जाणून घ्या भारतात कधी होणार?

El Nino | जगावर एल निनोचं मोठं सकांत येणार आहे. ज्याचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. एल निनोच्या (El Nino) प्रादुर्भावामुळे जगावर दुष्काळाचं संकट ओढवण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा याचा फटका बसणार आहे. ज्याचं कारण म्हणजे शेतीतील पिक उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. अशातच अमेरिकेतील एका हवामान अभ्यासक संस्थेने एल निनोचं (El Nino) अमेरिकेत आगमन झाल्याचं जाहीर केले आहे.

वाचा: शेतजमिनीचा ऑनलाईन नकाशा कसा काढायचा रे भाऊ? अरे शेतकऱ्यांसाठी आपलं ‘मी E-शेतकरी’ माहिती द्यायला आहे ना…

अमेरिकेत एल निनोचे आगमन
अमेरिकेत एल निनोच्या संकटाच आगमन झालं आहे. याचा थेट परिणाम मान्सूनवर होणार आहे. अमेरिकेतील हवामान अभ्यास संस्थेने एल निनोचा फटका नैऋत्येच्या मानसूनला बसणार असल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी या संस्थेने जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये परिणाम जास्त दिसण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर एल निनोचा परिणाम हिवाळ्यामध्ये जास्त दिसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

नक्की काय आहे एल निनो?
खरं तर, एल निनो ही एक नैसर्गिक हवामान घटना आहे. ती दर 3 ते 7 वर्षांनी येऊ शकते. भारतामध्ये एल निनोमुळे 2002, 2004, 2009 आणि 2012 या वर्षांत दुष्काळ पडले होते. आता अमेरिकेत या एल निनोच आगमन झाल्याचं जाहीर करण्यात आले आहे. पण ही परिस्थिती भारतावर येते की काय ही एक चिंताजनक बाब आहे.

शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिस्थितीचा फटका सर्वाधिक शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळं दुष्काळाची परिस्थिती ओढवणार आहे. शेतकऱ्यांची पिके पावसावर अवलंबून असल्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: A big crisis for farmers! El Niño hits Monsoon; It has arrived in America, know when it will be in India?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button