ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

MSP | बिग ब्रेकिंग! खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ; केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

MSP | केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच काही ना काही निर्णय घेत असत. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करताना त्या निर्णयांचा फायदा होईल. शेतकऱ्यांच्या शेतमालाला एमएसपी (MSP) म्हणजे हमीभाव दिला जातो. सरकारने दिलेल्या हमीभावाच्या (MSP) कमी दरात शेतकऱ्यांचा शेतमाल विकला जात नाही. आता याचं हमीभावाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात.

वाचा: शेतकऱ्यांनो फक्त 15 रुपयांत निघणार सातबारा; जाणून घ्या डिजिटल प्रक्रिया..

हमीभावात केली वाढ
शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी आज बुधवार दिनांक 7 जून रोजी ही माहिती दिली आहे. डाळींच्या किमतीत तब्बल दहा टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एमएसपीत वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

किती झाली वाढ?

  • तूर डाळीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढवून 7000 रुपये प्रति क्विंटल केली.
  • उडद डाळ 350 रुपयांनी वाढवून 6950 रुपये प्रति क्विंटल केली.
  • मुगाचा एमएसपी 7755 रुपयांवरून 10.4 टक्क्यांनी वाढवून 8558 रुपये प्रति क्विंटल केले.
  • भात सारख्या इतर खरीप पिकांचा एमएसपी 2040 रुपयांवरून 2183 रुपये प्रति क्विंटल केले.
  • मक्याचा एमएसपी 1962 रुपये प्रति क्विंटलवरून 2090 रुपये प्रति क्विंटल केले.
  • कापसाच्या एमएसपीमध्ये 9 टक्के वाढ करण्यात आली.
  • भुईमुगाच्या एमएसपीमध्ये 9 टक्के वाढ करण्यात आली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Increase in MSP of kharif crops; Central government’s big decision for farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button