ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या
ट्रेंडिंग

Kisan Credit Card | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! नक्की काय आहे किसान क्रेडिट कार्ड? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि जबरदस्त फायदे

Kisan Credit Card |आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथील निम्म्याहून अधिक नागरिक शेती व्यवसाय करतात. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. याचप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड अशा प्रकारची केसीसी योजना राबवली जाते. तर शेतकरी मित्रांनो ‘किसान क्रेडिट कार्ड’ म्हणजे काय? आणि ते शेतकऱ्यांना कशासाठी कामी येते बाबाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वाचा: शेतकऱ्यांना विहीरीसाठी मिळतंय 4 लाख अनुदान; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि नमुना

काय आहे किसान क्रेडिट कार्ड?
‘किसान क्रेडिट कार्ड’ ही एक सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती संबंधित कामासाठी आर्थिक मदत केली जाते. या किसान कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, कीटकनाशके यांसाठी कर्ज दिले जाते. पशुपालन शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन यासाठी देखील कर्ज मिळते. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी घेऊ शकतो. यामध्ये स्वतःच्या मालकीची जमीन असणारा जमीनधारक शेतकरी आणि भाडेतत्त्वावर शेती करणारा शेतकरी देखील समाविष्ट आहे.

किती मिळते कर्ज?
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 3 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जाला 7 टक्के व्याजदर लावला जातो. परंतु शेतकऱ्यांनी जर या कर्जाची परतफेड एका वर्षात केली तर व्याजदरात 3 टक्के सवलत मिळते. तसेच शेतमालाच्या विक्रीतून ही परतफेड करणे अपेक्षित असते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतच कर्ज हे बिनव्याजी मिळते. इतकंच नाहीतर, त्या शेतकऱ्याला अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याला 50 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिलं जाते. त्यासह इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचं विमा संरक्षण देण्यात येते.

कसा कराल अर्ज?
शेतकऱ्यांना सरकारकडून पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून दिला आहे. पीएम किसान निधीच्या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात Download KCC Form हा पर्याय तुम्हाला दिसेल. जेथे तुम्ही विचारलेली माहिती भरून हा फॉर्म भरून शकता. हा फॉर्म काळजीपूर्वक भरावा जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for farmers! What exactly is Kisan Credit Card? Know the application process and tremendous benefits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button