ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

NA Plots| राज्य सरकारचा मोठा निर्णय! जमीन एनए करण्याच्या नियमात केला मोठा बदल; जाणून घ्या एनए म्हणजे नेमकं काय?

NA Plots| शेत जमिनीच्या कायद्यात सातत्याने बदल होत जातात. हे बदल शेतकऱ्यांना लवकरात लवकर समजणं महत्त्वाचं असतं. ज्यावेळी शेतीमध्ये पीक घेतले जाते ती शेती शेतजमीन म्हणून ओळखली जाते. परंतु ती जमीन किंवा जागा जर औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी वापरासाठी वापरली जाते, त्यावेळी त्या जमिनीसाठी कायद्याची परवानगी घेणे आवश्यक असते. त्या जमिनीचं रूपांतर बिगरशेतीमध्ये (Non Agriculture) करावे लागते. याचं प्रक्रियेला एनए (NA) (अकृषिक) असे म्हणतात. आता एनए (NA) करण्याच्या नियमामध्ये आणखी सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

वाचा: शेतकऱ्यांवर मोठं संकट! एल निनोचा मान्सूनला मोठा फटका; अमेरिकेत झालं आगमन, जाणून घ्या भारतात कधी होणार?

नियमात सुधारणा करण्याचा निर्णय
एनए करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा शासन निर्णय महसूल विभागाकडून 23 मे 2023 रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयामध्ये बांधकाम परवानगी मिळालेल्या प्लॉटवर स्वतंत्ररित्या एनए परवानगीची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे आता एनए परवानगीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सरकारने एनए परवानगीच्या प्रक्रियेमध्ये नेमका काय बदल केला आहे.

काय करण्यात आली नवीन सुधारणा?
आता या निर्णयानुसार बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर आता स्वतंत्ररित्या एनए परवानगीची आवश्यकता नसणार आहे. यापूर्वी बांधकामाच्या परवानगीसाठी नागरिकांना नियोजन प्राधिकरणाकडे आणि एनए परवानगीसाठी महसूल विभागाकडे म्हणजेच दोन प्राधिकरणांकडे अर्ज करावा लागत होता. आता या सुधारणेमुळे नागरिकांना दोन वेगवेगळ्या विभागांकडे जाण्याची गरज नाही. आता बांधकाम परवानगी देतानाच जमिनीच्या एनए वापराची सनद दिली जाणार आहे.

एनए म्हणजे काय? आणि एनए का करतात?
सर्वसाधारपणे शेतीचा पिक घेण्यासाठी वापर केला जातो. परंतु ती जमीन किंवा जागा जर औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी वापरासाठी वापरली जाते, त्यावेळी त्या जमिनीसाठी कायद्याची परवानगी घेणे आवश्यक असते. त्या जमिनीचं रूपांतर बिगरशेतीमध्ये करावे लागते. याचं प्रक्रियेला एनए (अकृषिक) असे म्हणतात. राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू असल्यामुळे तुम्हाला जमिनीच्या तुकड्याची खरेदी विक्री करता येत नाही. यासाठी जमिनी करणे एनए गरजेचे असते. जमिन एनए केल्यावर तुम्ही विक्री करू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big decision of the state government! A major change was made in the rules for land NA; Know what exactly is NA?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button