ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Online Map | शेतजमिनीचा ऑनलाईन नकाशा कसा काढायचा रे भाऊ? अरे शेतकऱ्यांसाठी आपलं ‘मी E-शेतकरी’ माहिती द्यायला आहे ना…

Online Map |सातबारा वरू आपल्या जमिनीचा मालकी हक्क सात वाऱ्यावरून सिद्ध होतो. परंतु आपली जमीन किती क्षेत्रात व्यापली आहे, ती कोठे आहे हे सर्व जमिनीच्या नकाशावरून समजते. त्याचबरोबर जमिनीसाठी शेतरस्ता काढण्यासाठी देखील या जमिनीच्या नकाशाचा वापर होतो. आता शेतकऱ्यांना जमिनीचा रस्ता काढण्यासाठी जास्तीचा वेळ खर्च करावा लागणार नाही. कारण आता चुटकीसरशी ऑनलाइन पद्धतीने जमिनीचा नकाशा काढता येणार आहे.

वाचा: आनंदाची बातमी! शासनामार्फत घरकुल योजनेची यादी प्रसिद्ध, ‘अशा’प्रकारे ऑनलाईन डाउनलोड करा एका क्लिकवर…

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही तुमच्या जमिनीची हद्द जाणून घ्यायची असेल तर वेळ वाया न घालवता ऑनलाइन पद्धतीने जमिनीचा नकाशा कसा काढता येईल ही माहिती त्वरित जाणून घ्या. महाभिलेख विभागाद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सातबारा आणि आठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आता जमिनीचा नकाशा देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

का पहाल ऑनलाईन जमिनीचा नकाशा?

  • तर शेतकरी मित्रांनो जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी तुम्हाला गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in सर्च करावा लागेल.
  • या लिंक वर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला डाव्या बाजूला लोकेशन असे दिसेल.
  • या लोकेशनवर तुम्हाला राज्य, कॅटेगरीमध्ये रुरल व अर्बन असे पर्याय दिसतील.
  • तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला रुरल हा पर्याय निवडावा लागेल, तसेच जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला अर्बन हा पर्याय निवडावा लागेल.
  • या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी search by plot number यावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या सातबारा वरील गट क्रमांक टाकावा लागेल यानंतर लगेच तुमचा शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा तुमच्यापुढे सादर होईल.
  • यामध्ये डाव्या साईडला प्लॉट इन्फॉर्मशनवर क्लिक केल्यानंतर शेतजमीन कोणाच्या नावावर आहे याची सर्व माहिती मिळेल.
  • तर शेतकरी मित्रांनो आता ऑनलाइन पद्धतीने चुटकीसरशीसाठी या प्रक्रियेद्वारे आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा काढू शकणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: How to draw an online map of agricultural land bro? Oh, for the farmers, we have to give our ‘I am a farmer’ information…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button