Agritech | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! व्हिएसटी झेटोर आणि ई अस्त्रा एनएसीओएफकडून नवीन उत्पादने
Agritech |सीमांत शेतकऱ्यांसाठी व्हिएसटी झेटोर प्रायव्हेट लिमिटेड, व्हिएसटी टील्लर ट्रॅक्टर्स लिमिटेड आणि एचटीसी इन्वेस्ट (VST Zetor and E Astra NACOF) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात आणले आहेत. व्हिएसटी झेटॉर ४२११, व्हिएसटी झेटॉर ४५११ आणि व्हिएसटी झेटॉर ५०११ अशी ही तीन नवीन मॉडेल्स ४१ ते ५० एचपी क्षमतेची आहेत आणि त्यांची किंमत ८ ते ९ लाख रुपये आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांना या नवीन ट्रॅक्टरचा विशेष फायदा होणार आहे असा कंपनीचा दावा आहे.
या ट्रॅक्टरमध्ये अत्याधुनिक डीआय इंजिन, हेलिकल गियर्स, मजबूत ट्रान्समिशन आणि व्हीझेड मेटिक हायड्रोलिक्स यंत्रणा बसवण्यात आली आहे. केवळ शेतीच्या कामांसाठीच नाही तर वाहतुकीसाठीही या ट्रॅक्टरचा वापर करता येईल असे कंपनीने सांगितले आहे.
शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी ई अस्त्रा एनएसीओएफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडनेही पुढाकार घेतला आहे. या कंपनीने शेतकऱ्यांसाठी विविध इलेक्ट्रिक अवजारे विकसित केली आहेत. ई-वीडर, ई-रीपर, ई-ब्रश कटर आणि ई-कार्गो मल्टी-युटिलिटी थ्री व्हीलर ही यात समाविष्ट आहेत. देशातील शेतकऱ्यांना किफायतशीर दरात आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा यासाठी इलेक्ट्रिक उपकरणांवर भर देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या कमी होतील असा विश्वास कंपनीला आहे.
या दोन्ही कंपन्यांच्या नवीन उत्पादनांमुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल आणि त्यांच्या कामात अधिक कार्यक्षमता येईल.
Web Title: Good news for farmers! New products from VST Zetor and E Astra NACOF