ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Cyclone Biparjoy | बिपरजॉय चक्रीवादळाचा होणार तीव्र! 24 तासांत राज्यातील ‘या’ भागांना धोक्याचा इशारा, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कुठे?

Cyclone Biparjoy | देशाच्या किनारपट्टीला ‘बिपरजॉय’ (Cyclone Biparjoy) चक्रीवादळाचा मोठा धोका उद्भवला आहे. हे चक्रीवादळ आणखी जोर धरू पाहतय. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत हवामान विभागाकडून सतर्कता व्यक्त करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात हवामान विभागाने ‘बिपरजॉय’ (Cyclone Biparjoy) संदर्भात काय इशारा दिला आहे.

वाचा: शेतकऱ्यांना विहीरीसाठी मिळतंय 4 लाख अनुदान; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि नमुना



येत्या 24 तासांत चक्रीवादळ होणार तीव्र
येत्या 24 तासांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ होण्याचा धोका तीव्र होण्याचा इशारा वर्तवला आहे. इतकंच नाही, तर या चक्रीवादळाचा (cyclone in Mumbai) परिणाम तीन दिवस होऊ शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात हानी देखील होऊ शकते. हे चक्रीवादळ तीव्र झाल्यास याचा परीणाम भारताच्या किनारपट्टी भागातही होणार आहे.


कोणत्या भागांना आहे धोका?
मुंबई, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो. त्याचबरोबर गुजरातला देखील या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो. तर राज्यातील किनारपट्टीमधील (cyclone precaution) काही भागात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील मुंबई, पालघर, रायगज, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर (cyclone in mumbai live tracking) लाटा उसळण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

  • Web Title: Biparjoy cyclone threat will be intense! Warning of danger to ‘these’ parts of the state in the next 24 hours, farmers know where?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button