ताज्या बातम्या

Blue Aadhar Card | तुम्ही तुमच्या बाळासाठी निळे आधार कार्ड बनवलंत का? नसल्यास लगेच फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स

Blue Aadhar Card | Have you made a blue aadhaar card for your baby? If not then immediately follow these easy steps

Blue Aadhar Card | आधार कार्ड हे आपल्या देशातील महत्वाचे दस्तावेज आहे. प्रत्येक कामात आधार कार्ड (Blue Aadhar Card) विचारले जाते. लहान मुलांसाठीही आधार कार्ड महत्त्वाचे आहे. मुलाच्या शाळेतील प्रवेशासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज लागू शकते.

निळे आधार कार्ड
2018 पासून 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी ‘निळे आधार कार्ड‘ सुरु झाले आहे. हे कार्ड 5 वर्षांसाठी वैध असते. मोठ्या व्यक्तींप्रमाणे लहान मुलांचे बोटाचे ठसे यात घेतले जात नाहीत.

वाचा | Widow Pension Scheme | विधवा महिलांना महिन्याला मिळणार आर्थिक आधार! काय आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना?

आवश्यक कागदपत्रे:
मुलाचे जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिप
मुलं शाळेत जात असतील तर शाळेचे ओळखपत्र

  • अर्ज कसा करावा?
  • UIDAI वेबसाइट (uidai.gov.in) वर जा.
  • आधार कार्डचा पर्याय निवडा.
  • मुलाचे नाव, पालकांचा फोन नंबर आणि इतर माहिती भरा.
  • ब्लू आधार कार्ड नोंदणीसाठी अपॉइंटमेंट स्लॉट निवडा.
  • निवडलेल्या केंद्रावर जा.
  • पालकांचे आधार कार्ड, पत्ता पुरावा आणि मुलाचे जन्म प्रमाणपत्र सोबत द्या.
  • मुलाचा फोटो आणि कागदपत्रे पडताळणी केली जातील.
  • 60 दिवसांच्या आत तुमच्या मुलाच्या नावाचे निळे आधार कार्ड जारी झालेले असेल.

Web Title | Blue Aadhar Card | Have you made a blue aadhaar card for your baby? If not then immediately follow these easy steps

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button