ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Drone Subsidy | मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ महिलांना मिळणार 80 टक्के अनुदानावर ड्रोन; तब्बल 1261 कोटींचा निधी मंजूर

Big decision of Modi government! 'These' women will get drones on 80 percent subsidy; As much as 1261 crores of funds approved

Drone Subsidy | केंद्र सरकारने महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन पुरवण्यासाठीच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 2024-25 ते 2025-26 या कालावधीत 1261 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणणे हा आहे. या योजनेअंतर्गत, 2023-24 ते 2025-26 या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन पुरवण्याकरिता 15,000 निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यात येणार आहेत.

  • योजनेची वैशिष्ट्ये
  • आर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर व्यवहार्य असलेले योग्य क्लस्टर्स शोधून काढून, विविध राज्यांमधील अशा क्लस्टर्समधील प्रगतीशील 15,000 महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाईल.
  • ड्रोनच्या किमतीच्या 80% इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणून महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहेत.
  • अहर्ताप्राप्त, 18 आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बचत गटांच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी केली जाईल ज्यामध्ये 5 दिवसांचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि अतिरिक्त कीटकनाशक फवारणीच्या 10 दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे.

वाचा : Ration Card | मोदी सरकारचा गरिबांसाठी मोठा निर्णय! ‘इतके’ वर्ष मिळणार मोफत रेशन अन् महिलांना दरमहा 15 हजार; वाचा निर्णय

स्वयंसहायता गटातील इतर सदस्य/कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती, फिटिंग आणि यांत्रिक कामे करण्याची इच्छा आहे त्यांची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे केली जाईल ज्यांना ड्रोन तंत्रज्ञ/सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केले जाईल.
ड्रोन कंपन्यांद्वारे ड्रोन खरेदी करण्यात, ड्रोनची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, ड्रोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतनीस (मध्यस्थ) म्हणून एलएफसी काम करतील.
एलएफसीज याद्वारे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी यांसारख्या नॅनो खतांच्या स्वयंसहायता गटांसोबत ड्रोनद्वारे वापराला प्रोत्साहन देतील. स्वयंसहायता गट शेतकऱ्यांना नॅनो खतासाठी आणि कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाड्याने देतील.

Web Title: Big decision of Modi government! ‘These’ women will get drones on 80 percent subsidy; As much as 1261 crores of funds approved

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button