ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Yojana | आता राज्यातील शेतकऱ्यांना ‘मागेल त्याला योजना’! छत्रपती शिवाजी महाराज कृषीयोजनेच्या लाभासाठी ‘असा’ करा अर्ज

Now the farmers of the state will 'ask him for the scheme'! Apply for the benefit of Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Yojana

Yojana | राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना उद्भवणाऱ्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर करण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना आवश्यक असलेला घटक/बाब त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निर्णयानुसार, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना मागेल त्याला (Magel tyala yojana) फळबाग, ठिबक / तुषार सिंचन, शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे (BBF) व कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी १ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल. अर्ज करताना शेतकऱ्याच्या जमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक खाते पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता असेल.

वाचा : Reserve Bank Regulations | रिझर्व्ह बँकेच्या नियमांमुळे वैयक्तिक कर्ज महागणार; जाणून घ्या कुणाच्या खिशावर होणार परिणाम ?

अर्जाची स्वीकृती झाल्यानंतर अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर जमा केले जाईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असलेले घटक त्वरित मिळतील आणि त्यांचे आर्थिक नुकसान होईल. यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

  • अर्ज कसा करावा?
  • १. महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करा.
  • २. “मागेल त्याला योजना” या पर्यायावर क्लिक करा.
  • ३. आवश्यक असलेला घटक निवडा.
  • ४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ५. अर्ज सबमिट करा.
  • अर्जाची स्वीकृती झाल्यानंतर, अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर जमा केले जाईल.

हे वाचा :

Web Title: Now the farmers of the state will ‘ask him for the scheme’! Apply for the benefit of Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button