ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Schemes | शेतकऱ्यांनो पशुसंवर्धन विभागांतर्गत ‘या’ आहेत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना; त्वरित ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

There are various personal benefit schemes under the Department of Farmers and Animal Husbandry; Apply online immediately

Schemes | राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना (Schemes) व उपक्रमांद्वारे प्रयत्न केले आहेत. या योजनांमध्ये दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, १००० मार्सल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे बाटप व २५०३ तलंगा गट वाटप यांचा समावेश आहे. या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सन २०२३-२०२४ या वर्षात राबविली जाणार आहे.

 • पात्रता आणि निकष:
 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • अर्जदाराचा वय २१ ते ४५ वर्षांचा असावा.
 • अर्जदाराने किमान ५ वी पास किंवा समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे.
 • अर्जदाराने संबंधित क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेले असावे.
 • अर्जदाराने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असावा.

वाचा : Milk Rates | अर्रर्र..! दुधाच्या दरात थेट 8 रुपयांची घसरण; पशुपालक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट

अर्जदाराने खालील कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे:

 • फोटो ओळखपत्र
 • अपंग प्रमाणपत्र (ला)
 • दारिद्र्य रेषेचा दाखला
 • ७/१२ व ८अ उतारा
 • ग्रामपंचायत नमुना नं ८
 • जातीचा दाखला
 • बचत गट सदस्य प्रमाणपत्र
 • क्रेडिट कार्ड
 • अपत्य दाखला
 • प्रशिक्षण प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा?
अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ आहे. ऑनलाईन अर्ज https://ah.mahabms.com ya वेबसाईटवर करावा. या योजनांचा लाभ घेतल्यास ग्रामीण भागातील युवकांना आणि शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होईल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

Web Title: There are various personal benefit schemes under the Department of Farmers and Animal Husbandry; Apply online immediately

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button