ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | पुन्हा अवकाळी पावसाचा धोका! विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण

Weather Update | Risk of untimely rain again! 'Yellow Alert' for Vidarbha, cloudy over Marathwada and Madhya Maharashtra

Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण (Weather Update) राहील.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’!

हवामान विभागाने १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. खान्देशातही अवकाळी पावसाची (Weather Update) शक्यता आहे. तसेच विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील इतर भागांमध्ये उन्हाचा कडाका

राज्यातील काही भागांमध्ये मात्र उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला आहे.

वाचा | Crop Insurance | महाराष्ट्रात गारपिटीची अंदाज! शेतकऱ्यांनो पीक नुकसानीची चिंता नसावी, लगेच घ्या केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ

उत्तर भारतातही पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बंगाल आणि सिक्कीममध्ये 14 मार्चपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर, 17 मार्चपर्यंत पश्चिम बंगाल प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 14 ते 17 मार्च या कालावधीत ओडिशामध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून सूचना

हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाच्या काळात घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title | Weather Update | Risk of untimely rain again! ‘Yellow Alert’ for Vidarbha, cloudy over Marathwada and Madhya Maharashtra

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button