ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Forecast | हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठी अपडेट! आज ‘या’ ठिकाणी जोरदार बरसणार पावसाच्या सरी

A big update on rain from the Meteorological Department! It will rain heavily in this place today

Weather Forecast | राज्यामध्ये सर्वत्र मान्सून कधी दाखल होईल हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. जून महिन्यापासून शेतकरी वर्ग मोठ्या आशेने पावसाची (Maharashtra Rain Update) आस लावून बसले आहे. यंदाचा उन्हाळा ऋतूमध्ये उन्हाचा चटका सहन केल्यानंतर नागरिकांना देखील पावसाची आस लागली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये ऑगस्ट महिना अखेरीस आला तरीदेखील समाधानकारक पाऊस पडलेला नाही. अशातच, हवामान विभागाने कोकण विभागामध्ये आज जोरदार पावसाची (Weather Forecast) शक्यता वर्तवली आहे.

वाचा : Today Weather Forecast | शेतकऱ्यांच्या पिकाच काय होणार? राज्यात 4 दिवस ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

Heavy rain forecast today आज जोरदार पावसाचा अंदाज
कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची संतधार सुरू आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, कोकणामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता असून उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरी बरसणार आहे. राज्यामध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हे हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असून पूर्व टोक हे गोरखपुर, दरभंगा, बालुरघाट आणि मणिपूर भागापर्यंत सक्रिय झाले आहे.

There is no satisfactory rainfall in the state राज्यात समाधानकारक पाऊस नाही
तसेच, तमिळनाडू राज्याच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वारे वाहत आहे. तसेच, कर्नाटक राज्यापासून ते कोमोरीन भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्यातील उर्वरित भागांमध्ये अद्यापही समाधानकारक असा पाऊस पडलेला नाही. तसेच, अनेक भागांमध्ये कडक उन्हाची चाहूल जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक पावसाची आस लावून बसले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा :

Web Title: A big update on rain from the Meteorological Department! It will rain heavily in this place today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button