पूर्वनोंदणी शिवाय लस मिळणार की वशिलेबाजी चा होणार बाजार… पहा सरकारकडून आली नवीन नियमावली…
Vaccination without pre-registration will be the market for vaccination… See new regulations from the government
कोरोना लसीकरणाबाबत नवीन गाईडलाईन सरकार कडून आली आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना आता थेट केंद्रावर जाऊन नोंदणी करता येणार आहे. कोविन ॲप वर रजिस्ट्रेशन करून (By registering on the Covin app) आता स्लॉट घेण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. केंद्र सरकारच्या (Government of India) बैठकीमध्ये झालेल्या चर्चांमधून हा निर्णय घेण्यात आला.
आरोग्य सेतू(arogya Setu), उमंग(Umang) आणि कोविन ॲप( Cowin app ) वर रजिस्ट्रेशन करून स्लॉट बुकिंग चालू असणार आहे. 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींनी cowin ॲप वर जाऊन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. हे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच आपण थेट केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेऊ शकता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लसीकरण सोयीस्कर होण्यास मदत होईल.
लसीकरण मोहिमेत मागील गेल्या महिन्यात लस मोठ्या प्रमाणावर वाया जात होती. लसीकरणासाठी नोंदणी करून सुद्धा लोक लसीकरण घेण्यास जात नाहीत त्यामुळे लस वाया जाते. त्यामुळे केंद्र सरकार कडून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. लसीकरण केंद्रावर स्लॉट बुकिंग(Slot booking) नुसार पहिल्यांदा लसीकरण केले जाईल आणि नंतर लस जर शिल्लक राहिली तर ऑनसाईट लसीकरण ( Onsite vaccination) केले जाणार आहे. ही सुविधा फक्त लसीकरण केंद्रावरच (vaccination centre) उपलब्ध असेल.
हे ही वाचा….
मान्सून अंदमान मध्ये दाखल कधी बरसणार विदर्भामध्ये मान्सून चा सरी? पहा हवामान विभागाचा अंदाज…
2)स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनामुळे मिळणार तहानलेल्या गावांना पाणी…