Corona | बाप रे! महाराष्ट्रात वाढतोय कोरोनाचा वेग, उपाययोजनेसाठी आरोग्य सचिवांना केंद्राचं पत्र
Corona | देशामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संकेत मोठी वाढ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या (Number of corona patients) ही चिंतेची बाब असून यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले असून मृत्यूदरही मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र (Corona Maharashtra update) राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यांना काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे आणि आवश्यक ती खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव
केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सचिवांना राज्यात आठवड्याला टेस्टचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात घटले आहे. या सोबतच कोणत्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढते आहे आणि 10 टक्क्यांपेक्षा अधिक पाॅझिटिव्हिटी रेट कोणत्या जिल्ह्यात आहे, यासंदर्भातील माहिती दिली आहे.
वाचा: बाप रे! कोरोना-मंकीपॉक्सनंतर आता लम्पी आणि स्वाईन फिवरची दहशत, जाणून घ्या लक्षणं
काळजी घेण्याचं आवाहन
मात्र आगामी काळात राज्यात सणासुदीच्या मुहूर्तावर लोकांची अधिक गर्दी जमू शकते. याचमुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर लक्ष देऊन, त्यांचा पोजिटीव्हीटी दर तपासून उपाययोजना कराव्यात असे सांगितले. तसेच रुग्णांमध्ये वाढ होऊन न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
कोरोना रुग्णसंख्या व मृत्यूदर
तर देशामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झाली आहे. तर 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. तर शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आणि दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात शुक्रवारी 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तर 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
वाचा: अतिपावसामुळे पिकाचं नुकसान होतंय? तर ‘या’ तंत्रज्ञानाद्वारे करा पिकाचं संरक्षण
छत्तीसगडमध्ये अज्ञात आजारामुळे रुग्णांचा मृत्यू
तर छत्तीसगडमध्ये एका अज्ञात आजारामुळे नागरिकांचा मृत्यू होत आहे. ज्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. छत्तीसगड जिल्ह्यातील कोन्टा ब्लॉकमधील रेगडगट्टा गावात अज्ञात आजाराने खळबळ उडवून दिली आहे. तर या अज्ञात आजाराने दोन वर्षांत 61 जणांचा मृत्यू झालाय. त्यासह आज देखील त्या गावातील 40 हून अधिक ग्रामस्थ या आजाराच्या विळख्यात आहेत. मात्र या आजाराबाबत कोणतीही माहिती समोर आली नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: