Corona | बाप रे! कोरोनासह देशात ‘या’ व्हायरसची दहशत, तज्ज्ञांकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
देशात पुन्हा एकदा कोरोनाने मान वर काढली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची (Maharashtra Corona Patients) संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
Corona | त्याचबरोबर अनेक रुग्णांचे मृत्यू (Corona patient death) देखील होत आहेत. अशातच आता झिका विषाणूच्या (Zika virus) प्रसारासंदर्भात एका अभ्यासातून वैज्ञानिकांनी मोठा खुलासा केला आहे. शास्त्रज्ञांना देशातील अनेक राज्यांमध्ये झिका विषाणूच्या प्रसाराशी संबंधित पुरावे सापडले आहेत, ज्याच्या आधारावर तज्ज्ञांनी राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
झिका, चिकुनगुनिया व डेंग्यू
झिका विषाणू एक किंवा दोन नव्हे तर देशाच्या अनेक भागांमध्ये आहे. या संसर्गासोबतच डेंग्यू आणि चिकुनगुनियाचीही भूमिका उपयुक्त ठरत आहे. म्हणजेच याच रुग्णामध्ये झिका व्यतिरिक्त डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचाही परिणाम दिसून येत असून, त्यांची तपासणी केली असता या रुग्णांना दुय्यम संसर्ग असल्याचे आढळून आले ज्याची देशात अद्याप पुष्टी झालेली नाही. फ्रंटियर्स या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, अलीकडच्या काळात भारतात झिका विषाणूची गंभीर स्थिती दिसून येत आहे. गेल्या वर्षी विविध राज्यांतूनही अनेक प्रकरणे समोर आली होती.
वाचा: Corona | बाप रे! कोरोनाचा होतोय चक्क मेंदूवर परिणाम, जगभरातील संशोधकांनी केलाय ‘हा’ दावा
1475 पैकी 67 रुग्णांमध्ये हा विषाणू आढळून आला
ICMR च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता यांनी सांगितले की, गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर दरम्यान देशातील 13 राज्यांमधून 1475 रुग्णांचे नमुने गोळा करण्यात आले. यादरम्यान 67 रुग्णांमध्ये झिका, 121 रुग्णांमध्ये डेंग्यू आणि 10 रुग्णांमध्ये चिकुनगुनियाची पुष्टी झाली. झिका व्हायरसची सर्व प्रकरणे लक्षणात्मक होती.
वाचा: Corona | बाप रे! देशात वाढतोय कोरोनाचा वेग, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण तर ‘इतके’ मृत्यू
यापैकी 84 टक्के रुग्णांना ताप आला असून 78 टक्के रुग्णांच्या शरीरावर लाल पुरळ उठण्याची लक्षणे दिसून आली. डॉ. गुप्ता म्हणाले, आमच्यासाठी धक्कादायक परिस्थिती आली जेव्हा आम्ही काही नमुन्यांमध्ये झिका-डेंग्यू, झिका-चिकुनगुनिया आणि डेंग्यू-चिकुनगुनिया आणि झिका हे तिन्ही नमुने एकत्र पाहिले. येत्या काळात हा पसारा आणखी वाढला तर देशासाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: