Corona Virus Guidelines | ब्रेकिंग! कोरोनाचा धोका वाढल्याने आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी, ‘या’ गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन
Corona Virus Guidelines | राज्यात कोरोनाची प्रकरणे वाढत चालली आहेत. अशातच आता नव्या आजाराने थैमान घातलं आहे. ज्याचं नाव H3N2 influenza आहे. या विषाणूचा संसर्ग देखील वेगानं पसरत आहे. कोरोना (Corona Virus Guidelines) पुन्हा एकदा मान वर काढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना विषाणू आपली दहशत पुन्हा निर्माण करू पाहतोय. त्यामुळेच आता आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना (Corona Virus Guidelines) जारी करण्यात आले आहे.
वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या
राज्यात कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे
राज्यामध्ये कोरोना विषाणूची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर रविवारी मिळालेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांमध्ये राजधानी दिल्लीत 72 आणि महाराष्ट्रात 236 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा राज्यात ही प्रकरणे वाढू शकतात. गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 71 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर देशात कोरोनाचे 5 हजार 915 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मार्गदर्शक सूचना जारी
कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आले आहेत. ज्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. तसेच ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याचबरोबर गंभीर लक्षणे किंवा तीव्र ताप असलेली रुग्ण 5 दिवसांसाठी रेमडेसिव्हिर औषध घेऊ शकतात. परंतु, ते देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावे.
‘या’ मार्गदर्शक सूचना केल्या जारी
- कोरोनासोबत इतर कोणतेही विषाणूजन्य संसर्ग आहे का, याची नोंद घ्यावी.
- मास्कचा वापर करावा.
- सुरक्षित सामाजिक अंतर राखा.
- शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करावे.
- अन्यथा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Fruit Insurance | 8 फळपीक विमा योजनेंतर्गत अर्जाची ठरली तारीख, जाणून घ्या अर्ज आणि ‘या’ फळपिकांच्या अंतिम तारखा
- Yojana | 700 कोटींच्या गुंतवणूकीतून द्राक्ष-डाळिंबासाठी राबवण्यात येणार ‘ही’ योजना, जाणून घ्या काय होणार फायदा
Web Title: Breaking! Due to the increase in the threat of Corona, the Ministry of Health has issued guidelines, urging people to take care of things