Corona virus| धक्कादायक! कोरोनातून बरे होऊनही सुटका नाही, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर; ‘हे’ होतात दीर्घकालीन परिणाम
Corona virus| कोरोनानं जगात पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही अनेक साथीच्या रोगांसोबतच कोरोनाही वाढला आहे. लोकांनी पुन्हा एकदा आपले मास्क्स बाहेर काढले आहेत. सातारा जिल्ह्यात तर जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्ती लागू केली आहे. लशींचा काही फारसा परिणाम झाल्याचं जाणवत नाही. कोरोना झालेले रुग्ण बरे होतात हे जरी खरं असलं तरी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची वास ओळखण्याची क्षमता बाधित होत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या ह्या व्हायरसचे माणसावर आणखी काय काय परिणाम होणार हे बघावं लागेल.
वाचा: विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर
कुणी केलं संशोधन
डॉ. निक्सन अब्राहम यांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. पुण्यातील विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) ते संशोधक म्हणून कार्यरत आहेत. हे संशोधन ‘करंट रिसर्च इन न्यूरो बायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेत प्रकाशित झालं आहे. डॉ. निक्सन यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या एका टीमनं हे संशोधन केलं. यासाठी बी.जी. वैद्यकीय महाविद्यालयाची (ससून) त्यांना मदत झाली.
काय होतात परिणाम
डॉ. निक्सन यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या टीमनं हे संशोधन केलं. या संशोधनात सहभागी झालेल्यांची चार गटात विभागणी करण्यात आली. या चार गटात कोरोची लक्षणे नसलेले, विषाणूचे वाहक असलेले, बरे झालेले आणि निरोगी व्यक्तींची निवड करण्यात आली होती. या टीमनं अल्पोक्सोमीटर (Alpoxometer) विकसित केलं. त्याद्वारे कोविड मधून बरे झालेल्या दोनशे रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यांना वास घेण्यासाठी दहा प्रकारचे गंध दिले गेले. त्यातील 80 टक्के रुग्णांच्या वास ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचं समोर आलं.
असे आहेत निष्कर्ष
या संशोधनातून काही धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत. कोरोना संसर्गानंतर रुग्णांच्या न्यूरल सर्किट्सवर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. ही बाब मेंदूशी संबंधित आहे. यामुळे याचा बहुतांश परिणाम रुग्णांवर होतोच. याशिवाय कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमधील घ्राणेंद्रियाची वास घेण्याची क्षमता प्रभावित झाल्याचं आढळून आलं आहे. यापुढे आणखी संशोधन करण्याचा संशोधकांचा मानस आहे.
त्यामुळे कोरोनातून बरं झाल्यानंतरही रुग्णांची सुटका होत नाही असंच म्हणावं लागेल.
हेही वाचा:
- सरकारी कचेऱ्यांना वैतागलाय! काळजी करू नका, आता मोबाईलवरच मिळणार शेतीचे नकाशे
- चढ की उतार काय आहेत आज तूर ,सोयाबीन, अन् कांद्याचे ताजे बाजारभाव? त्वरित जाणून घ्या
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..