इतर

True Voter | आता ‘या’ मोबाईल ऍपवर उपलब्ध होणार मतदार यादी, नावातील हरकती सुधारण्यासाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर (Voter List) हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत 3 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

True Voter | महापालिकेसह राज्यातील 14 नगरपालिकांच्या निवडणुकांची (Election) तयारी निवडणूक आयोगाने (Election Commission) सुरू केली आहे. प्रभाग स्तरावर मतदारांच्या नावांची यादी (Voter Name List) जारी करण्यात आली आहे. यावेळी मतदारांची मतदार यादी डिजिटल (Digital Voter List) पद्धतीने जारी करण्यात आली आहे. मतदारांना त्यांची नावे मोबाईलवर ट्रू व्होटर ऍपमध्ये (True Voter App) पाहता येतील तसेच त्यातील त्रुटी सुधारण्यासाठी तक्रारी करता येतील.

निवडणूक आयोगाची तयारी सुरू
राज्यात नवी मुंबई महापालिकेसह ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.

वाचा: Petrol Diesel | मोठी बातमी! लवकरच राज्यात पेट्रोल डिझेल स्वस्त, वाचा मुख्यमंत्र्यांनी काय केली इंधनावरील ‘व्हॅट’संदर्भात घोषणा

ट्रू वोटर मोबाईल ऍप
मतदार यादीत मतदारांचे अचूक नाव असणे आवश्यक आहे. नावात तफावत आढळल्यास मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागते, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत पेपर प्रक्रियेद्वारे नाव दुरुस्तीसाठी अर्ज करण्याऐवजी त्यांना डिजिटल पद्धतीने नावात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ट्रू वोटर मोबाईल ऍपवर नवी मुंबई महानगरपालिकेसह 14 नगरपालिकांची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सर्व नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. याआधी मतदारांना त्यांचे नाव पाहून ते दुरुस्त करून घेता येईल. जवळपास 50 हजारांपेक्षा जास्त मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाइल फोनमध्ये इन्स्टॉल केले.

वाचा: Eknath Shinde | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलांचं नक्की काय झालं? जाणून घ्या एका क्लिकवर..

कसे शोधाल नाव?
‘मतदार यादी’ शोध मेनूवर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकून पुढे जाऊ शकता. नाव शोधल्यावर संपूर्ण माहिती मिळेल. त्यानंतर, तुम्ही ‘मतदार यादी आक्षेप’ वर क्लिक करून, ‘मतदार यादी निवडणूक वेळापत्रक 2022’ निवडून आणि नंतर योग्य पर्यायावर जाऊन तुमचा आक्षेप नोंदवू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button