पशुसंवर्धन

In drought prone areas | महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात चारा डेपो उभारणीस मंजूरी!

Construction of fodder depots approved in drought affected areas of Maharashtra

मुंबई, 15 जून: राज्यातील अनेक भागात पावसाचा अभाव असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यास अडचण येत आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून, राज्य सरकारने राज्यातील 1 हजार 245 महसुली मंडळांमध्ये चारा डेपो उभारण्यास परवानगी दिल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी दिली.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना जनावरांसाठी चारा मिळवण्यास कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला. जून महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी, पावसाचे प्रमाण अपुरा असल्याने अनेक गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती कायम आहे.

वाचा :Calcium | कॅल्शियमची कमी? हाडे कमकुवत होण्याची चिंता? जाणून घ्या मजबूत हाडं आणि दात मिळवण्याचे सोपे मार्ग!

सध्या राज्यात 512.58 लाख टन हिरवा चारा आणि 144.55 लाख टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जून महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज शासनाने वर्तवला आहे. अनेक भागातील शेतकरी चारा डेपो सुरू करण्यासाठी आग्रही होते. नुकतेच पार पडलेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता देऊन शासन निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

चारा डेपोमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे:

  • जनावरांसाठी चारा सहज उपलब्ध होईल.
  • चाऱ्याच्या दरांवर नियंत्रण येईल.
  • शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल.
  • दुष्काळाचा परिणाम कमी होण्यास मदत होईल.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ते लवकरात लवकर चारा डेपोसाठी अर्ज करावेत.

या उपक्रमामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल आणि त्यांच्या जनावरांचे रक्षण होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button