ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2024 | आषाढी वारीसाठी दिंडींना 20 हजार रुपयांचे अनुदान

20 thousand rupees subsidy to Dindis for Ashadhi Vari

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा, वारकऱ्यांसाठी दिलासा

पुणे: आषाढी वारीसाठी राज्यातून येणाऱ्या दिंडींना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वारकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि त्यांना ही आर्थिक मदत निश्चितच फायदेशीर ठरेल.

दौंडमधील कत्तलखाना रद्द!

याच बैठकीमध्ये वारकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दौंडमधील कत्तलखान्याविषयी आक्षेप घेतला होता. यानंतर, मुख्यमंत्री शिंदे यांनी दौंडमधील भीमा नदीच्या किनाऱ्यावर बांधण्यात येणाऱ्या कत्तलखान्याला रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

वाचा :Crop insurance scheme | पीक विमा योजनेतून १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना ११३ कोटी रुपयांचा लाभ!

वारकऱ्यांना टोल माफ!

यंदाच्या वर्षीही वारकऱ्यांना टोल माफ करण्यात आला आहे. या निर्णयाचे वारकरी प्रतिनिधींनी टाळ वाजवून स्वागत केले.

चांगल्या नियोजनासाठी सरकार कटिबद्ध

मुख्यमंत्री शिंदे यांनी यंदाच्या वर्षी आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे. वारीवेळी होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी गृह विभागाला कडक आदेश देण्यात आले आहेत.

शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय

आमचे सरकार शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास वचनबद्ध आहे. गेल्या काही महिन्यांत शेतकरी महिला आणि तरुणांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालयातून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची पुरेशी काळजी

आषाढ वारीतील वारकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनांवर उपाययोजना म्हणून गतवर्षीपासून विमा योजना राबवण्यात आली आहे. वारीसाठी जास्तीत जास्त एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. स्वच्छतेसाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणेचा सहभाग घेण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र आणि पुरेशी सुविधा, आरोग्य सुविधा, महाआरोग्य शिबिरांचे आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या आणि मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता यासह अनेक सुविधांचे काटेकोर नियोजन केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

हे निर्णय वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करतील आणि यामुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुव्यवस्थित आणि भक्तिरम्य बनेल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button