कृषी बातम्या

उन्हाळ्यात फळबागेची ‘ घ्या’ अशी काळजी व करा या उपाययोजना…

Take care of the orchard in summer and take these measures.

उन्हाळ्यामध्ये फळबागांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते व फळबागांच्या व्यवस्थापन याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. उन्हाळ्यामध्ये उन्हाची तीव्रता असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग देखील वाढत जातो त्यामुळे झाडांना योग्य पाण्याची आवश्यकता असते. जर झाडांना व्यवस्थित पाणी मिळाले नाही तर परिणामी झाडे लवकर खराब होतात करपतात तसेच वाळून जाण्याची शक्यता देखील असते तसेच नवीन झाडे असल्यास झाडून जाण्याची शक्यता देखील असते झाडांची वाढ खुंटली जाते. नवीन पाने येण्यास अडचण निर्माण होते म्हणजेच काय एकूण फळबागेची होण्याची हळूहळू खराब होण्याचे चिन्हे दिसू लागतात परिणामी त्याचा उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो

चला पाहुयात उन्हाळ्यामध्ये फळबागांची कशी काळजी घ्यायची…

📌 आच्छादनाचा वापर केल्यास जमिनीमध्ये ओलावा टिकूण राहू शकतो तसेच पाण्याचे बाष्पीभवनही लवकर होणार नाही. त्याकरता आच्छादन पद्धतीचा वापर करणे केव्हाही सोयीस्कर ठरेल यासाठी वाळलेले गवत, उसाचे पाचट, लाकडाचा भुसा, गव्हाचे काड इत्यादींचा आच्छादनासाठी वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचा पोत देखील सुधारण्यास मदत मिळते. आच्छादनाची जाडी शक्यतो 12 ते 15 सेंटिमीटर इतकी असावी. आच्छादनामुळे पाण्यांच्या अंतर वाढवत देखील येते पिकाची चांगली जोमाने होते तसेच जमिनींच्या भेगाची तीव्रता कमी होते.

📌 फळ झाडे जास्त अंतरावर असतील तर त्यासाठी मटका सिंचन पद्धती ही फायदेशीर ठरते. आर्थिकदृष्ट्या परवडणारे देखील असते फळझाडे लहान असतील तर म्हणजेच दोन ते तीन वर्षाची असतील तर त्याकरता सात लिटर इतक्या आकाराचे मडके निवडावे. तीन वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या झाडांना 15 लिटर इतक्या आकाराच्या मणक्याची निवड करावी
मडके गळ्याभोवती जमिनीत पुरावे हे पाणी मडकेद्वारे झिरपत राहते. त्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत पाणी पटकन पोचण्यास मदत होते. मडके झाकून ठेवावे त्यामुळे मडक्यातील पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही ही पद्धत फक्त छोट्या बागांसाठी करता येते मोठ्या बागांना ही पद्धत वापरता येणार नाही.

📌ठिबक सिंचनद्वारे देखील फळबागांची पाण्यासाठी व्यवस्थित काळजी घेतली जाते ठिबक सिंचन द्वारे सकाळी व रात्री पाणी दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. पिकांना गरजेइतकेच पाणी या पद्धतीत मिळते या पद्धतीमुळे पाण्यात व खर्च देखील बचत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button